20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

“सहा महिन्यांत स्वत:ला सुधारा अन् मीडियावरही सोशल व्हा…”; देवेंद्र फडणवीसांकडून आमदारांची झाडाझडती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

भाजपचे आठ ते दहा आमदार वगळता अन्य सर्व आमदार सोशल मीडियाच्या वापरात मागे पडत आहेत. येत्या सहा महिन्यांत स्वत:ला सुधारा आणि या मीडियावरही सोशल व्हा, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.आज प्रत्येक आमदाराच्या सोशल मीडियावरील कामगिरीचे मूल्यमापन करणारे अहवाल त्यांच्या हातात देण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. मात्र, ही बैठक नव्हती तर झाडाझडती होती, असे सांगण्यात आले.

 

फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्विटर या सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरील वावराचा आणि आशयाचा लेखाजोखा त्यांच्या हातात सोपवण्यात आला आणि त्यांच्या नजरेखालून गेलेला हा अहवाल नंतर त्यांच्याकडून परत घेण्यात आला. येत्या काही महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आपापल्या हँडलवर झळकवा अन् ती जाहीर करा असे सांगण्यात आले आहे. विकसित भारत योजनेचा प्रसार करण्यासाठी तालुक्यांतालुक्यांत रथ फिरविण्याची योजना आखली आहे. तिची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याचे आदेश देण्यात आले.

 

महाराष्ट्रातील भाजपचे आमदार राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन कार्यक्रमांना गैरहजर राहात असून याविषयाची दखल घेतली गेली आहे. ऑनलाइन बैठकीला दांडी मारण्याचे प्रकार करू नका. केंद्रीय नेतृत्वाचे बारीक लक्ष आहे. प्रत्येक घडामोडींकडे ते लक्ष ठेवून आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले. सोशल मीडियावर भाजप आमदारांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यासंदर्भात अहवालात आपल्या कामाचा लेखाजोखा पाहून काही आमदार अस्वस्थ झाल्याची कुजबूज सुरु होती.

 

स्वत:चे काम तपासा-

 

भाजप आमदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील सरकारी निर्णयांच्या योजना प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघात कशा राबवल्या, ते पाहावे. अंमलबजावणी कशी झाली, याचे सादरीकरण तयार ठेवावे, सोशल ऑडिट करावे, असा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांच्या आदेश आहे. त्यानुसार प्रत्येक आमदाराने स्वत:चे काम तपासून पाहावे असेही ठरले. सोशल मीडियातील उपस्थितीचे ऑडिट आवश्यक ठरणार आहे, असे सांगण्यात आले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles