18.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

पिण्यासाठी पाणी नाही, पीक हातचं गेलं, रेशन वेळेवर मिळतं नाही, रोजगार हमीच काम नाही, पीएम किसानचा लाभ नाही; केंद्रीय पथकासमोरच शेतकऱ्याने गाऱ्हाणं मांडलं!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक बीड जिल्हा दौऱ्यावर आहे. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर समस्यांचा पाढा वाचत बीड जिल्हा प्रशासनाला धारेवर धरत उघड पाडलंय. पिण्यासाठी पाणी नाही, पीक हातचं गेलं, रेशन वेळेवर मिळतं नाही, रोजगार हमीच काम नाही, पीएम किसानचा लाभ नाही; असं गऱ्हाण मांडताच जिल्हाधिकारी यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला बोलवा, असं म्हणत वस्तुस्थिती दडवण्याचा प्रयत्न केला.

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यभर फिरत आहे. हे केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहे. या पथकासमोर शेतकऱ्यांनी  आपली गाऱ्हाणी मांडण्यास सुरवात केली. आपली गाऱ्हाणी मांडताना शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी देखील हजार होते.

पथकाकडून महामार्गालगतच पाहणी

 

केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावर देखील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला की पाहणी फक्त महामार्गाच्या लगतच केली जात असून याची खरी वस्तुस्थिती पहायची असेल प्रत्यक्ष शेतात या. अशी पाहणी केली तर त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाच नाही असं देखील शेतकरी म्हणत आहे.

दरम्यान आलिशान गाड्यांचा मोठा ताफा दौऱ्यावर लाखोंचा खर्च, मात्र या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा खरंच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार का? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles