16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पैशाच्या देवाणघेवाणीवरून दोन सख्या भावांत वाद; जबर मारहाणीत सैनिक भावाचा मृत्यु

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पैशाच्या वादावरून दोन सख्या भावांत वाद होऊन यात सैनिक असलेल्या मोठ्या भावाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

प्रवीण विनायक पवार (वय ३९ रा.वाघळूज ता.आष्टी) असे मयताचे नाव आहे. प्रवीण हे झारखंड येथे सीआरपीएफ मध्ये नोकरीला असून मागील पंधरा दिवसांपासून सुट्टीवर गावी आले होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण व त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. पैशाच्या वादावरून दोन सख्या भावांत वाद झाला. यात प्रवीणला बेदम मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू मारहाणीत जखम झाल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

 

या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच घटनास्थळाचाही पंचनामा केला. याप्रकरणी प्रवीण यांच्या पत्नी सीमा पवार यांच्या फिर्यादीवरून सासू झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, भावजयी सोनाली पवार, दीर विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीत आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles