पुणे | प्रतिनिधी
समस्त विश्वकर्मीय समाज बांधवाच्या सामाजिक जाणिवेतून समन्वय विचाराने व सहकार्याने निर्धारित समाज ध्येयावर वाटचाल करत , सामाजिक एकतेचे व दिशादर्शक कार्याचे अवलोकन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आळंदी देवाची येथे येत्या २४ डिसेंबर २०२३ रोजी भव्य राज्यस्तरीय समाज महामेळावा आयोजित करण्यात आला असून, या समाज महामेळाव्यात राज्यभरातील सर्व सुतार समाज बांधवांनी सहपरिवार सहकुटुंब वेळ-विचार-कृतीने रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी 9.00 वाजता सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे विद्यानंद मानकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्रातील विश्वकर्मीय समाज चळवळीची कार्यदिशा म्हणून राज्यभरातील तालुका जिल्हा स्तरावर कार्यरत समाजसंस्था, संघटना व सामाजिक कार्यातील सक्रिय मान्यवरांच्या विचार सहभागातून दि. 9 डिसेंबर 2018 टोजी पुणे येथे सर्वाच्या सहमतीने ठराव पारित करून महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीची स्थापना करण्यात आली, आणि समन्वय विचारांच्या ह्या पर्वांने पूर्ण महाराष्ट्र व्याप्ती केली. समन्वय समितीच्या स्थापनेपासून 5 वर्षाचा सामाजिक कार्यावर दृष्टिक्षेप टाकला तर सामाजिक संवाद, समाजाचे न्यायिक विषय तसेच समाजावर आलेल्या आपत्तीत, संकटात पाठीशी उभी टाकणारी एकमेव भक्कम ताकद म्हणून समन्वय समिती आपल्या सर्वाच्या सहकायनि समाजाच्या विश्वासास पात्र ठरली आहे. समाजाच्या याच विश्वासाला सार्थ करणारा व समाजाभिमुख उपक्रमाची सुरुवात करणारा हा भव्य राज्यस्तरीय महामेळावा ठरणार आहे. सद्य परिस्थितीत शासन व्यवस्थेकडून समाजहीताचे व समाजाभिमुख निर्णय ह्या मेळाव्यात आपल्या सर्वांच्या साक्षीने, सहकार्याने तसेच आद्यसंत भोजलिंग काका महाराज यांनी समाजाला दिलेल्या प्रेरणेने काही ठराव पारित करून शासन दरबारी सादर करणे व पूर्तता होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे सुध्दा अत्यंत आवश्यक आहे. समाजासाठी मूलभूत विषयांवर काम करताना समाजासमोरील आव्हाने व उपलब्ध पर्यायाने समाजातील कष्टकरी कारागीर वर्ग, गरजवंत समाजबांधव यांच्या समस्येसह शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरण इत्यादी समाजाभिमुख उपक्रमांची सुरुवात ह्या महामेळाव्यातून करत आहोत. महाराष्ट्रातील विश्वकर्मीय समाजाची स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असलेली समाज चळवळ, समाजाचा क्रांतिकारी, सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसा तसेच आजवर समाज चळवळीच्या जडणघडणीत सार्थ योगदान देणाऱ्या समाजसेवक, समाज रत्नांचा गौरव करून भावी कार्याची प्रेरणा देणारा असेल. समाजाभिमुख उपक्रम तसेच आजच्या काळाची गरज ओळखून प्रगल्भ विचारधारे सोबतच समाजाचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या आद्यसंत भोजलिंग काका महाराज यांच्या पावन सानिध्यात विश्वकर्मीय समाजाच्या समाज संस्कृतीला साजेसा व सामाजिक चळवळीच्या भवितव्याची उभारणी करण्यासाठी आपण सर्वांनी सहपरिवार सहकुटुंब वेळ-विचार-कृतीने रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी 9.00 वाजता फुटवाले धर्मशाळा, 332 प्रदक्षिणा रोड, संत आळंदी देवाची, पुणे येथे महामेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे विद्यानंद मानकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे .