13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

आरोग्य विभागाच्या क आणि ड दर्जाच्या पदाच्या परीक्षेसाठीचे हॉल तिकीट असे करा डाऊनलोड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीविषयीची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज (24 November)आरोग्य विभागातील क आणि ड दर्जाच्या पदासाठीच्या परीक्षेसाठी लागणारे हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. जे उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत ते arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाऊनलोड करु शकतात.

 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क आणि ड दर्जाच्या पदांसाठीची लेखी परीक्षा 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर आणि 12 डिसेंबर 2023 ला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी परिक्षार्थींनी हॉल तिकीट डाऊनलोड केल्यानंतर ते चेक करावे. त्यात परीक्षेच्या ठिकाणाविषयीची माहिती असेल. जर या परीक्षेसाठीचे हॉल तिकीट डाऊनलोड करायचे असेल तर अर्जाचा क्रमांक आणि जन्मतारीख अशी माहिती तुम्हाला संबंधित वेबसाईटवर टाकावी लागेल.

 

हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

arogya.maharashtra.gov.in या आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
होम पेजवर ‘APPLY HERE For Group D- Click Here for New Registration/Login’ असे दिसेल तिथे क्लिक करा. त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल ज्यावर New Registration /Login असे दिसेल. तिथे क्लिक करा.
तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/ लॉगिन आयडी तिथे टाका. पासवर्ड टाका आणि Submit वर क्लिक करा.
आता तुम्हाला स्क्रीनवर हॉल तिकीट दिसेल ते डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.

किती पदांसाठी भरती ?

मिळालेल्या माहितीनुसार, 10,949 पदांसाठी ही नोकर भरती होणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट घेऊन जाणे बंधनकारक आहे. जे परीक्षार्थी हॉल तिकीटशिवाय परीक्षा केंद्रावर जातील त्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे तुमचे परीक्षा केंद्र कुठे आहे आणि तुम्ही परीक्षेला जाताना हॉल तिकीट सोबत घेतले आहे की नाही हे चेक करा. अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles