16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

माझे राजकारण म्हणजे समाजकारण, तर नगर परळी रेल्वे हे माझे वचन – खा. डॉ. प्रितमताई मुंडे 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी येथील कृषी प्रदर्शनाचा शेतकरी यांनी लाभ घ्यावा – मा.आ भीमराव धोंडे

 

आष्टी | मनोज पोकळे

 

ज्येष्ठ नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांचा दिवाळी फराळ आणि कार्यकर्त्यांचे स्नेहमिलन हा कार्यक्रम म्हणजे.. संवादाची संधी असून राजकारणामध्ये गेली नऊ वर्ष आपण राजकारण म्हणजे समाजकारण करत असून नगर ते परळी रेल्वे सुरू करणे हे माझे वचन आहे असे प्रतिपादन खा. डॉ.प्रीतम मुंडे यांनी केले..

तर भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासनावर आपला पूर्ण भरवसा असून सध्याच्या महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीवर निश्चितपणे समंजसपणे तोडगा काढला जाईल याचा मला विश्वास आहे..असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले..

 

खा.डॉ.प्रीतम मुंडे या आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आयोजित केलेल्या दीपावली फराळ आणि कार्यकर्ता स्नेहमिलन या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होत्या..

 

त्यापुढे म्हणाल्या गेली ९ वर्षे मी केवळ परळी भागाची नसून संपूर्ण जिल्ह्याची खासदार आहे अशा पद्धतीने काम केले असून दुष्काळ असो, अवकाळी पाऊस असो किंवा कोविड सारखे संकट असो संपूर्ण जिल्हाभर माझा संपर्क असतो संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांगाची तपासणी झालेली असून लवकरच दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे सन २०२४ पूर्वी बीड पर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण होऊन रेल्वे सुरू झाली असती परंतु मधल्या महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांत या कामासाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे त्या कालावधीत काम बंद पडल्यामुळे हा उशीर होत असल्याची सांगून त्यापुढे म्हणाले की सप्टेंबर २०२३ अखेर किमान अमळनेर पर्यंत रेल्वे सुरू व्हायला हवी होती त्यासाठी मी आज संपूर्ण रेल्वे प्रशासनाची बैठक आयोजित केली होती.. आपली नियत साफ असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मला पाठिंबा असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी माझ्यामागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करून यानंतरची निवडणूक ही लोकसभा असल्यामुळे आतापासूनच आपण तयारीत राहू.. संवेदनशील परिस्थितीमध्ये प्रत्येक समाजाला पटेल असेच काम आपण केले असून आष्टी विधानसभा मतदारसंघात आपण गेले चार वर्षे विरोधी पक्षाचे काम केले असून कार्यकर्त्यांना पुरेसे बळ देऊ शकलो नाही हे खरे असले तरी आपण त्याग शिकवणाऱ्या पार्टीचे कार्यकर्ते आहोत याची जाणीव सर्वांना आहे पंकजाताई या ग्रामीण विकास मंत्री असताना त्यांनी करोडो रुपयांची कामे आणले आणि कार्यकर्त्यांनी केली तरीही काही कार्यकर्त्यांची नाराजी होतीच.. विकासाचा अनुशेष अद्याप बाकी असून यासाठी गावो गावचे नेते आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढलेली आहे.. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोण कुठे ? आहे आणि कोण उद्या कुठे जाईल ? याचा नेम नाही.. क्षणिक फायद्यासाठी राजकीय तडजोडी न करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतात आणि पराभवातून खचून न जाता आत्मपरीक्षण करून आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून प्रत्येक कार्यकर्त्याने सुजाण पणे काम करावे.. भीमराव धोंडे हे ज्येष्ठ नेते संयमी असून त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामांमध्ये फार मोठे काम केलेले आहे असे खा. मुंडे यांनी सांगितले..

श्रेय वादाची लढाई सुरू आहे- भीमराव धोंडे 

आ.भीमराव धोंडे पुढे बोलताना म्हणाले की, डाॅ.प्रीतम ताई मुंडे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघात ७१ हजार मतांची लीड मिळाल्यामुळे मी थोडासा बिनधास्त होतो परंतु वरून दोस्ती आणि आतून कुस्ती झाल्यामुळे आपला पराभव झाला सध्याची राजकीय फाटा फूट पाहता खा. डॉ. प्रीतम मुंडे या नशिबवान आहेत कारण येणारी निवडणूक लोकसभेची आहे आणि त्यांना भाजपा शिवसेना आणि अजित पवार गट यांची भक्कम साथ मिळणार असल्यामुळे त्याचा निवडणुकीमध्ये त्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे..असे सांगून आता कोट्यावधी रुपयाची विकास कामे मंजूर केल्याचे सांगून श्रेय वादाची लढाई सुरू आहे..परंतु ३० आणि ४० कोटी रू.ची कामे ही लवकर होणार आहेत काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.. सध्या राज्यात भाजपा शिवसेना आणि अजित पवार गट असे सरकार तीन पक्षाचे असल्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला वाटा मागण्याचा अधिकार आहे त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की,मी पहिलवान आहे त्यामुळे मी संयमी आहे..मला वाईट बोलता येत नाही मी कधीही विकास कामासाठी पैसे घेतलेले नाहीत आणि घेणारही नाही माझ्या काळामध्ये मी रस्ते, पाझर तलाव आणि बंधार्‍यांची मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत आगामी काळामध्ये दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांना पत्र लिहून यावर उपाययोजना करण्यात यावी यासाठी पत्र दिलेले आहे तसेच भविष्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावी लागतील असे सांगत रेल्वे परळी पर्यंत लोकसभा निवडणुकीपूर्वी गेली तर जनतेची चांगली सुविधा निर्माण होईल असे सांगीतले

कृष्णा खोरे अंतर्गत खुंटेफळ साठवण तलाव कामासाठी श्रेयवाद सुरू आहे परंतु मी देखील जलसंपदा मंत्री यांच्याकडे जाऊन ही सर्व प्रकल्प सुरू करावेत यासाठी प्रयत्न करणार आहे.. सध्या राज्यभरात मराठा आरक्षणामुळे जातीय असंतोष निर्माण झालेला आहे परंतु राज्य शासनाच्या कार्यपद्धतीवर आपला पूर्ण विश्वास असल्यामुळे या प्रश्नी तोडगा निघेल असा विश्वास आहे असे सांगितले सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका या सरकारची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील शेतकर्यांसाठी आष्टी येथिल पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात २४ डिसेंबर पासून पाच दिवसाचे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन असे आवाहन मा.आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.

 

या कार्यक्रमांमध्ये.. रामराव खेडकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांना खरं बोला आणि खरं वागा कार्यकर्ते सांभाळा राजकारण सोबत राहिलेले नाही असा इशारा दिला.

 

समाजसेवक विजय गोल्हार म्हणाले की पंकजाताई साहेब मुंडे आणि खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या मुळेच बीड जिल्ह्याचा विकास होत असल्याचे सांगितले

 

यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष अॅड. वाल्मीक निकाळजे म्हणाले की हा संवादाचा कार्यक्रम असून भाजप हा बीड जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे भीमराव धोंडे हे भोळा महादेव असून त्यामुळे त्यांचा पराभव झाला सर्वांशीच गोड बोलून होणार नाही भीमराव धोंडे साहेबांनी काही जणांना दुखवावे..सत्तेचा धाक दाखवावा शासकीय कर्मचाऱ्यांवर वचक ठेवावा आणि कार्यकर्त्यांची बाजू घेऊन त्यांचा सांभाळ करावा त्यांना खंबीरपणे साथ द्या.. भीमराव धोंडे यांना आपणास मंत्री करावयाचे असल्यामुळे सर्वांनी त्यांचे साठी जनतेमध्ये जाऊन काम करावे असे सांगितले..

 

यावेळी बोलताना आष्टी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष साहेबराव मस्के म्हणाले की गेल्या विधानसभे निवडणुकीतील पराभवापासून मतदारसंघांमध्ये पोकळी निर्माण झाली असून पंकजाताई मुंडे आणि भीमराव धोंडे या दोघांनाही दगाफटका झाला त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे काहीजण दिवसा भांडण आणि रात्री एकत्र असे चालू असून सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे..भीमराव धोंडे यांना उमेदवारी देण्याबाबत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा शब्द पंकजाताईंनी पाळला.. जिल्ह्यामध्ये पंकजाताई, खासदार प्रीतम ताई आणि भीमराव धोंडे हे एकत्र असतील तर काहीही होणार नाही भीमराव धोंडे साहेबांनी खुनशी राजकारण कधीही केलं नाही भीमराव धोंडे संयमाचा महामेरू असून शांततेचे भांडार आहे असे सांगितले..

या कार्यक्रमांमध्ये.. पांडुरंग नागरगोजे, अशोक साळवे, आदिनाथ सानप, अनुरथ सानप, पांडुरंग गावडे, बाबुशेठ भंडारी, रामदास बडे, सुधीर घुमरे, डॉ. मधुसूदन खेडकर यांची समयोचित भाषणे झाली..या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर देशमुख यांनी केले

अजय धोंडे, अभय धोंडे, राजेंद्र धोंडे, हरिष खाडे, अशोक साळवे, बाबुशेठ भंडारी, रामराव खेडकर, आदिनाथ सानप,अनुरथ सानप, महेंद्र नागरगोजे, पांडुरंग नागरगोजे, डाॕ.मधुसुदन खेडकर,बाळासाहेब पवार,किशोर खोले,नवनाथ नागरगोजे,अरुणभैय्या निकाळजे,पांडुरंग गावडे,सुधीर घुमरे,दिलीप म्हस्के, नवनाथ सानप, एन.एम.बडे,नगरसेवक ज्ञानदेव राऊत,सरपंच सावता ससाणे, छगन तरटे, सरपंच पोपट गोंडे,तात्यासाहेब कदम,महादेव कोंडे,संभाजी कोकणे,प्रकाश कोकणे, बबन औटे,गौतम सावंत,सदा पाटील दिंडे,संजय धायगुडे, सरपंच ज्ञानेश्वर वाघ,आदिनाथ बेलेकर,शंकर देशमुख,ह.भ.प.शांताराम भालके महाराज,अंकुश मुंढे,सरपंच पंढरीनाथ चंदनशिव,महादेवनाना वायभासे,बाळसाहेब वाघुले,विठ्ठलराव लांडगे, हरिभाऊ जंजीरे,महादेव खकाळ,सतीशमामा झगडे,संतोष गोल्हार, अनिल जायभाये, संजय मिसाळ,विष्णु दहिफळे, दिलीपराव काळे, भागवत वारे, हरिभाऊ तांदळे, उत्तमराव बोडखे, प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ,प्राचार्य डाॕ.कैलास वायभासे, आण्णासाहेब लांबडे, सुदामकाका झिंजुर्के,मधुकर शिरोळे,राम झगडे,बबन सांगळे,बाळासाहेब शेकडे,शिवाजीराजे गर्जे,सरपंच सोमीनाथ गायकवाड,नानाभाऊ वाडेकर,सरपंच अशोक पाखरे,बजरंग कर्डीले, सरपंच तात्यासाहेब नालकोल,रघुनाथ शिंदे,दादा जगताप,माऊली पानसंबळ,संचालक तात्यासाहेब लाड,नवनाथ खेडकर आदि सामाजिक ,राजकीय,धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी सुत्रसंचालन पत्रकार निलेश दिवटे यांनी केले

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles