13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अखेर ‘द कुटे’ ग्रुपचे सुरेश कुटे परिवारासह भाजपवासी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड । प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा ‘द कुटे ग्रुप’ चे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांचा अखेर भाजपात प्रवेश झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे कुटे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी अर्चना कुटे आणि मुलगा आर्यन कुटे यांचीही उपस्थिती होती. कुटे यांच्या भाजपा प्रवेशने जिल्ह्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कुटे यांच्या तिरूमला ग्रुप मधील काही कंपन्यांची आयकर विभागाने तपासणी केली होती. यानंतर हा प्रवेश झाल्याने याचीही चर्चा होत आहे.

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि ’द कुटे’ ग्रुपच्या माध्यमातून देशभर ओळख असलेले सुरेश कुटे यांच्या कुटे उद्योग समूहावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळेपासून सुरेश कुटे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.

सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे दाम्पत्य भाजपात प्रवेश करील अशा अटकळी अनेक दिवसांपासून बांधल्या जात असतानाच आज (दि.10) कुटे यांनी जाहीरपणे भाजपात प्रवेश केला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रवेश दिला.या प्रवेशाने आता बीड जिल्ह्यातील भाजपमधील अनेक समीकरणे बदलणार आहेत. भाजप कुटे यांच्याकडे लोकसभेचे उमेदवार म्हणून पाहत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

विशेष म्हणजे या प्रवेशावेळी बीड जिल्ह्यातील भाजपचा कोणताही मोठा पदाधिकारी उपस्थित नव्हता,त्यामुळे आता कुटे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस गट पंकजा मुंडेंच्या बीड जिल्ह्यात वेगळा सवतासुभा निर्माण करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

केंद्रीय आयकर विभागाकडून तपासणी ते भाजप प्रवेश

सुरेश कुटे यांच्या कंपन्यांची मागच्या महिन्यात केंद्रीय आयकर विभागाकडून तपासणी झाल्यानंतर ते अध्यक्ष ज्ञानराधा मल्टिस्टेटची आर्थिक कोंडी झालेली असताना त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा, त्यातच त्यांना साडेचार हजार कोटी रुपयांचा गुंतवणूकदार भेटणे आणि मग लागलीच भाजप प्रवेश यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
कापड दुकान ते तिरुमला ऑईल, तिरुमला हेअर ऑईल, तिरुमला डेअरी, ओएओ इन्फो, डीएनआर इंडिया अ‍ॅटोटेक, तिरुमला ट्रेड्स, तिरुमला अ‍ॅग्रो, डीएनएस सप्लाय अशा विविध कंपन्या व साधारण 17 हजार कोटी रुपयांचे नेटवर्थ असलेल्या द कुटे ग्रुपचे चेअरमन सुरेश कुटे आतापर्यंत राजकारणापासून कोसो दुर होते. मात्र, मधल्या काळात त्यांच्या समूहाची केंद्रीय आयकर विभागाने नियमित तपासणी केल्यानंतर ते अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटमधून ठेवी काढण्यासाठी झुंबड उडाली होती.

आजही या मल्टिस्टेटची आर्थिक घडी बसलेली नाही. मात्र, याच वेळी त्यांच्या प्रवेशाची चर्चा होत होती. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि त्यांच्या ग्रुपमध्ये साडेचार हजार कोटी रुपये गुंतविणारा भागीदार मिळणे हादेखील योगायोग ठरला आहे. त्यातून या ठेवीदरांचे पैसे देणार असल्याचे त्यांनी कालच जाहीर केले.

दरम्यान, त्यांच्या द कुटे ग्रुपमुळे जिल्ह्याचाही लौकिक झाला तसेच हजारो बेरोजगारांना नोकर्‍या मिळाल्या आहेत. दीपावलीनंतर सुरेश कुटे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेशाची चर्चा असताना त्यांनी अचानक नागपूरमध्ये छोटेखाली कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रवेशाच्या घाईमुळेही राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त होत आहे

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles