20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

मिशन २०२४ साठी मित्रपक्षांच्या विजयाची जबाबदारीही भाजप घेणार!; मेगा प्लॅन शिरावर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मोठा विजय मिळवून केंद्रात सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महाराष्ट्रात यावेळच्या निवडणुकीत नवे मित्रपक्ष सहभागी झाल्याने भाजपने लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही आपली रणनीती बदलत मेगा प्लॅन तयार केला आहे.

या प्लॅनमध्ये महायुतीतील मित्रपक्षांच्या विजयाची जबाबदारीही भाजप स्वत:च्या शिरावर घेणार आहे. त्यासाठी भाजपकडून राज्यभरात वॉर रूम उभारण्यात येणार आहे. विधानसभेचे राज्यातील २८८ मतदारसंघ आणि लोकसभेच्या ४८ मतदारसंघांत यश मिळवण्याच्या दृष्टीने भाजप तयारीला लागले आहे. वॉर रूमच्या माध्यमातून भाजप प्रत्येक उमेदवारावर लक्ष ठेवणार आहे.

 

महाविजय २०२४ साठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर भाजपचे वॉर रूमचे जाळे पसरवण्यात येणार आहे. राज्यातल्या २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपच्या वॉर रूम सुरू करणार आहे. त्या माध्यमातून मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघ आणि उमेदवारावर भाजप लक्ष ठेवणार आहे. मतदारसंघातील समस्या, लोकांचे प्रश्न समजून घेण्याचाही वॉर रूमचा मुख्य हेतू आहे. भाजपच्या या तयारीसंबंधी माहिती देताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले, ”भाजप ३६५ दिवस निवडणुकीची तयारी करणारा पक्ष आहे. २०१४ पासून निवडणूक व्यवस्थापनात भाजपने स्वत:ची अशी व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे सर्व विधानसभा मतदारसंघात वॉर रूम तयार करत आहोत. ही तयारी महायुतीसाठी आहे. एखादा मतदारसंघ महायुतीच्या शिवसेना मित्रपक्षाकडे असेल, तर ती जागाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यादृष्टीने आम्ही या वॉर रूम तयार करत आहोत.”

 

या वॉर ‌रूममध्ये तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करणे, अधिक गतिमान पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन करणे आणि तिसरे काम म्हणजे केंद्र व राज्यातील योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, असा उद्देश आहे.

 

बारामतीसह १८ मतदारसंघांवर विशेष लक्ष

 

लोकसभा निवडणुकीत यशासाठी भाजपने मिशन ४५ सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी किमान ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपने ठेवले आहे. बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघांत भाजप आपली ताकद लावणार आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles