13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

गेवराईचे आ.लक्ष्मण पवारांचा राजीनामा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कुणबी प्रमाणपत्र असणार्‍या आरक्षणाचा लाभ होणार असला तरी सरसकट मराठा आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. आरक्षणाला पाठिंंबा म्हणून दोन दिवसापासून राजीनामा सत्र सुरू केले असून आज गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठविला आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. याआधी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच मनोज जरांगे यांनी आमदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतयं. त्यातच आता भाजप आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झालं तर सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण केली जातेय.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles