13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही; हायकोर्टाचा निर्वाळा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सोशल मीडियावर एखादी आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. अर्थात, अशा प्रकारची पोस्ट शेअर किंवा रिपोस्ट करणे मात्र माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत दंडात्मक कृत्य असणार आहे; असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

आग्र्यातील मोहम्मद इम्रान काझी यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना कोर्टाने हे स्पष्टीकरण दिलं. या व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक केली होती. त्यामुळे त्याच्यावर आयटी कायद्याच्या कलम 67 आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर कलमांखाली फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हायकोर्टाने निर्णय देत ही कारवाई रद्द केली.

 

न्यायमूर्ती देशवाल म्हणाले, “माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत हे स्पष्ट आहे, की अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे हा गुन्हा आहे. एखादी पोस्ट किंवा संदेश पोस्ट केल्यावर प्रकाशित झाला असे म्हटले जाऊ शकते आणि पोस्ट किंवा संदेश शेअर किंवा री-ट्विट केल्यावर प्रसारित केला म्हटलं जाऊ शकतं.”

 

“सध्याच्या प्रकरणात, असा आरोप आहे की अर्जदाराने फरहान उस्मान नावाच्या व्यक्तीने केलेली पोस्ट लाईक केली आहे, परंतु पोस्ट लाइक करणे हे पोस्ट प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे नाही, तर केवळ पसंत करणे आहे. त्यामुळे केवळ एखादी पोस्ट लाईक करणे हा आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा म्हणता येणार नाही.” असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles