बीड |
राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ०३ ऑक्टोंबर 2023 रोजी राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार संगणक प्रणालीव्दारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दिनांक १६/१०/२०२३ ते २०/१०/२०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार दिनांक १६/१०/२०२३ पासून संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.
नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र (affidavit) संगणकप्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर तांत्रिक अडचण maha online कडून दूर करण्यात आली आहे. सबब दिनांक १८/१०/२०२३ ते २०/१०/२०२३ या कालावधीत नामनिर्देशानाची सकाळी ११.०० ते दु. ३.०० वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतींच्या मुदत संपण्यापूर्वी निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे