-9 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

spot_img

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत बीड जिल्ह्याचा समावेश करा-विश्वकर्मा जिल्हा संघटनेची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई |

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत बीड जिल्ह्याचा समावेश करून या योजनेचा लाभ ओबीसी प्रवर्गातील विविध घटकांना द्यावा अशी मागणी विश्वकर्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू पांचाळ यांनी केली आहे.

या संदर्भात येथील उपविभागीय अधिकारी यांना विश्वकर्मा प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की १७ सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा बलुतेदार,अठरा आलुतेदारासह सुतार, लोहार,कुंभार,सोनार, नाबी, फुलारी,धोबी (परिट ),शिंपी,गुरव या सारख्या मायक्रो ओबीसी प्रवर्गाचा व्यवसायीक,आर्थिक स्थर उंचवण्यासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पी. एम. विश्वकर्मा योजना जाहीर करून एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला असुन ही योजना महाराष्ट्राच्या अन्य जिल्हयात प्रभावी पणे राबवल्या जात आहे मात्र या योजनेचा लाभ अद्याप बीड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळत नसून ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविलेली जात नसल्याचे दिसुन येत आहे

ही योजना पंतप्रधान कार्यालयाकडून अवगत करून या योजनेबाबत आपल्या स्तरावर लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करुन ओबीसी प्रवर्गातील गरीब व होतकरू कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्या साठी प्रयत्न करावे अशी मागणी या निवेदना द्वारे करण्यात आली असुन या निवेदनावर विश्वकर्मा प्रतिष्ठानचे बीड जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रस शहर उपाध्यक्ष विष्णू पांचाळ, विश्वकर्मा प्रतिष्ठान तालुका अध्यक्ष दत्तात्रय पांचाळ, बाळासाहेब पांचाळ,

खंडेराव पांचाळ,नाना पांचाळ, अशोक पांचाळ, ज्ञानेश्वर पांचाळ,बबन निनवरे, दिंगबर सांगेकर, एकनाथ पांचाळ,नितीन पांचाळ, मधुकर सुखसे, उमाकांत जाधव, जाधव कृष्णा, बळीराम पांचाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles