20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

टॉयलेट साफ करायला लावणं महागात पडलं, शिंदेंच्या ‘या’ खासदारवर गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नांदेड |

मागील काही दिवसापासून नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रूग्णालयात रूग्णायांचा मृत्यू होत आहे. यातच नांदेड येथील शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णालय दगावल्याने शिवसेना शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील यांनी रूग्णालयाच्या डीनलाच टॉयलेट साफ करायला लावले. यानंतर हेमंत पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून आता काॅंग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाताना शौचालयाची सफाई करायला लावल्याप्रकरणी डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलील ठाण्यात हेमंत पाटील यांच्यासह अन्य १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे राज्यातील मार्ड डॉक्टर खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड मधील शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांच्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी माफीची मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण राज्यातील डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे मार्डने म्हटलं आहे. मार्डने पत्रक काढून ही मागणी केली आहे.

दरम्यान, खोके सरकारमधील लोकप्रतिनिधी शासकीय कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घरचे नोकर असल्यासारखे वागवत आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्यात वारंवार अश्या अपमानस्पद व मानहानीकारक घटना घडत आहेत व मुख्यमंत्री गप्प बसले आहेत. कर्मचारी-अधिकारी यांचे पगार कापायचे, गुन्हे दाखल करायचे आणि मंत्र्यांचे, लोकप्रतिनिधिंचे लोणचे घालायचे काय ? सर्व जबाबदारी सरकारी नोकरवर्गाची आहे का? शासनाने अडवून ठेवलेली नोकरभर्ती, अपुरा कर्मचारीवर्ग, पायाभूत सुविधांचा अभाव , वेळेवर पगार न होणे याकडे कोण लक्ष देणार. स्वतःची निष्क्रियता झाकण्यासाठी एका डॉक्टरला टॉयलेट साफ करायला लावता? लाज वाटत नाही का तुम्हाला? असा सवाल काॅंग्रेसने राज्य सरकारला केला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles