18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

अविनाश साबळेची ‘सुवर्ण धाव’, एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकाला गवसणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे   याने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये इतिहास रचला. भारतीय लष्करात असलेल्या अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेल ( अडथळ्यांची) शर्यतीत ८ मिनिटे १९.५०सेकंदाची वेळ नोंदवत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. तो आशियातील सर्वात वेगवान ३००० मीटर स्टीपलचेसपटू ठरला.  अविनाशने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या होसेन केहानीचा ८ मिनिटे २२.७९ सेकंदाचा चा आशियाई विक्रम मोडला.

३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत अविनाशने सुरुवातीपासूनच गती सेट केली आणि पहिल्या ५० मीटरमध्ये उर्वरित खेळाडूंना मागे टाकले. त्याने शेवटपर्यंत हा वेग कायम ठेवला आणि २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला १२ वे सुवर्णपदक मिळवून दिले आणि स्टीपल चेस स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवले. अविनाश आता आशियाई क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर शर्यतीतही सहभागी होणार आहे.

गेल्या महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश हा 7 व्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे त्या कामगिरीवर अविनाश साबळे देखील स्वत: खुश नव्हता. मात्र, अविनाशने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नव्या उमेदीन सहभाग घेतला आणि आज सुवर्णपदाकवर अखेर नाव कोरलच.

अविनाश साबळे यानं आजच्या स्पर्धेपूर्वी यंदाच्या हगांमातील हांगझोऊ येथील आशिायाई क्रीडा स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असल्याचं म्हटलं होतं. मी राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यासाठी धावत नसून हांगझोऊ मधील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा मानस असल्याचं तो म्हणाला होता. मी आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी धावणार आहे. यासाठी प्रशिक्षण घेतलं असून चांगली कामगिरी करुन सुवर्णपदकावर नाव कोरणार असा निर्धार त्याने केला होता.

अखेर अविनाशची स्वप्नपूर्ती झाली
अखेर अविनाश साबळेनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरण्याचं स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. याशिवाय तो 5 हजार मीटर क्रीडा प्रकारात देखील प्रयत्न करणार आहे. 3000 मीटर स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा विश्वास अविनाश साबळे यानं स्पर्धेपूर्वी व्यक्त केला होता. तो त्यानं सत्यात उतरवला आहे.

अविनाश मूळचा बीड जिल्ह्यातला
अविनाश साबळे  मूळचा  बीड जिल्ह्यातल्या आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करत आहे. 12वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अविनाश भारतीय लष्कराच्या 5 महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला होता. दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आता चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. 12 सुवर्ण, 11 रौप्य आणि 16 कांस्यपदकांसह भारताने आतापर्यंत 44 पदकं मिळवली आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles