17.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. घाना देशात होणाऱ्या 66व्या राष्ट्रकूल संसदीय परिषदेला हजेरी लावणार होते.30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही परिषद होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी होणार आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचा दौरा रद्द झाला असल्याचं माहिती समोर येत आहे.

राहुल नार्वेकर यांच्या या दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली होती. राज्यात लोकशाहीची हत्या झाली आहे आणि नार्वेकर घानाला जात आहेत, फक्त वेळकाढूपणा करण्यासाठी हे केलं जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या टीकेला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. लंडनला जाण्यापेक्षा घानाला गेलेलं बरं, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

दरम्यान राहुल नार्वेकर यांच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौराही पुढे ढकलण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जर्मनी आणि लंडन दौरा पूर्वनियोजित होता. या दौऱ्यात ते उद्योग तंत्रज्ञानांशी संबधित करार करणार होते. तसेच मराठी भाषिकाशी संवाद साधणार होते. मुख्यमंत्र्यांसोबतचं उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रशासकीय अधिकारीही या दौऱ्यात सहभागी होणार होते. एकूण दहा दिवसांचा हा दौरा होता, पण हा दौराही पुढे ढकलला गेला.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles