17.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

अखेर 20 दिवसानंतर ओबीसी महासंघाचे उपोषण संपलं; फडणवीस यांची शिष्टाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

२१ दिवसांपासून सुरु असलेले ओबीसी महासंघाचे उपोषण मागे घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपोषणस्थळी गेले होते. त्यांच्या हस्ते पाणी पिऊन रविंद्र टोंगे यांनी उपोषण मागे घेतले.

काल ओबीसी समाज आणि सरकारची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेण्यात आली.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा-ओबीसी वाद निर्माण होणार नाही, याची सरकार काळजी घेणार आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. पण ओबीसींवर आघात होणार नाही, याची सरकार काळजी घेईल.

 

काल झालेली बैठक रेकॉर्ड झाली आही. राष्ट्रीय ओबीस महासंघाला त्याची प्रत देखील आम्ही दिली आहे. आश्वासन दिलं आणि पूर्ण होणार नाही असं अजिबात होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

मी मुख्यमंत्री असताना ओबीसी मंत्रालय वेगळं केल. नरेंद्र मोदी यांनी देखील ओबीसी हिताचे अनेक निर्णय घेतले. ओबीसींच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे फडणवीस म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles