26.8 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img

रोहित पवारांना मोठा झटका; बारामती ॲग्रो 72 तासात बंद करण्याचे आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मोठा झटका बसला आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचपार्श्वभूमीवर रोहित पवारांना रात्री २ वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस बजावली आहे.

 

बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केली आहे. रोहित पवार यांना रात्री 2 वाजता नोटीस दिली असून 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसीच्या माध्यमातून दिली आहे. रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

रोहित पवार यांनी केलेल्या ट्वीटमध्ये, “दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.” असे म्हटले आहे.

 

तसेच “युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

 

रोहित पवार  म्हणाले की, “हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.”

 

“आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे. असो!

 

पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन्-महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील.” , असे रोहित पवार  म्हणाले आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles