18.2 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

संसदेच्या विशेष सत्राचे सूप वाजलं; महिला आरक्षण विधेयक मंजुरीनंतर दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

वी दिल्ली |

केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष सत्राचे आज रात्री उशिरा सूप वाजलं. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सभापती जगदीप धनकड यांनी केली.त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचे म्हटले.

 

संसदेचे विशेष अधिवेशन हे 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आले होते. सरकारने कोणताही अजेंडा जाहीर केला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. यामध्ये संसदेच्या जुन्या वास्तूमधून नव्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यात आला. मंगळवारी विशेष अधिवेशनादरम्यान कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडले होते. बुधवारी लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. मतदान प्रक्रिया स्लिपद्वारे पार पडली. ज्यामध्ये विधेयकाच्या बाजूने 454 आणि विरोधात 2 मते पडली. मतदानावेळी पंतप्रधान मोदीही सभागृहात उपस्थित होते. हे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आले. राज्यसभेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले.

 

राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत हजेरी लावली. लोकसभेत पंतप्रधान दाखल झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित होत असल्याची घोषणा लोकसभा अध्यक्षांनी केली.

 

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर नव्या संसद भवनात कामाचा शुभारंभ झाला. पंतप्रधान मोदींनी नव्या संसदेत सर्व खासदारांना संबोधित केलं. तसेच, नव्या संसद भवनातून पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. महिला आरक्षण विधेयकासंदर्भात केलेली घोषणा ही नव्या संसद भवनात मोदींनी केलेली पहिली मोठी घोषणा आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles