20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजना पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना आधार आणि फायदे देणारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकार्पण केलेली ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजना पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना आधार देणारी आणि त्यांना अनेक फायदे देणारी योजना आहे.

या योजनेंतर्गत काही अटींवर तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. ही योजना सुरू झाल्यामुळे देशभरातील सुमारे 30 लाख विश्वकर्मा कुटुंबांना फायदा होणार आहे. याद्वारे पारंपरिक कलाकुसरीत गुंतलेल्या लोकांना मदत करण्यावर भर दिला जाणार आहे.

 

विश्वकर्मा योजनेला (Vishwakarma Yojana) केंद्र सरकार 13,000 कोटी रुपयांच्या खर्चासह पूर्णपणे निधी देणार आहे. या अंतर्गत बायोमेट्रिक आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून मोफत नोंदणी कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे केली जाईल. त्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, पाच टक्के सवलतीच्या व्याजदराने एक लाख रुपये (पहिला टप्पा) आणि दोन लाख रुपयांपर्यंत मोफत कर्ज सहाय्य (दुसरा टप्पा), डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि विपणन सहय्याद्वारे मान्यता प्रदान केली जाईल.

 

  • योजनेचा उद्देश

 

विश्वकर्मा योजनेचा (Vishwakarma Yojana) उद्देश कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य प्रदान करून देशभरातील छोट्या व्यावसायिकांची क्षमता वाढवणे आहे. या योजनेंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमईशी जोडले जाईल, जेणेकरून त्यांना चांगली बाजारपेठ मिळू शकेल.

 

योजनेत पात्र असलेले व्यवसाय

 

पीएम विश्वकर्मा (Vishwakarma Yojana) ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीर आणि शिल्पकारांना सहाय्य प्रदान करेल. या योजनेच्या अंतर्गत 18 पारंपरिक कलाकुसरींचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी सुतार, सोनार, कुंभार, धोबी, शिंपी, चांभार, गवंडी, विणकर/चटई/झाडू बनविणारे, दोर्‍या वळणारे/बेलदार, पारंपारिक खेळणी बनविणारे, शिल्पकार/मूर्तिकार, नाभिक, हार तयार करणारे, मासेमारीचे जाळे विणणारे, होड्या बांधणारे, चिलखत तयार करणारे, लोहार, कुलूप तयार करणारे, कुर्‍हाड आणि इतर लोखंडी हत्यार बनविणारे पात्र आहेत.

 

  • योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 

आधार कार्ड, निवडणूक मतदार ओळखपत्र, व्यवसाय करीत असल्याचा पुरावा किंवा व्यवसाय नोंदणी केलेले प्रमाणपत्र, बँकमध्ये खाते असलेला पुरावा किंवा सबसिडी पात्र कोणत्याही बँकेचे खाते, उत्पन्नाचा दाखला किंवा प्रमाणपत्र, गरज वाटल्यास जातीचे प्रमाणपत्र.

 

  • पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे

 

कारागिरांना या योजनेमध्ये अनेक फायदे मिळणार असून, पारंपरिक व्यवसायाचे जतन, कौशल्य विकासाबरोबर आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी उपयोगी पडणार आहेत.

 

1. सुरुवातीस 1,00,000 रुपयांपर्यंत कर्ज 5 टक्के व्याज

 

2. वेळेत कर्ज फेडल्यास आणखी 2,00,000 रुपयांपर्यंत कर्ज 5 टक्के व्याज

 

3. कौशल्य विकास प्रशिक्षण व प्रशिक्षण काळात दररोज 500 रुपये मानधन

 

4. व्यवसाय साहित्य खरेदीसाठी 15,000 रुपये मिळणार

 

5. ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळणार

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles