16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

दुध भेसळी विरूध्द  धडक मोहीम;  23 किलो खवा व 3025 लिटर भेसळयुक्त दुध नष्ट केले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
  • बोगस दुग्धजन्य पदार्थविरुद्ध धडक कारवाई

बीड |

जिल्हयातील दुध भेसळ रोखण्यासाठी मा.त्रिभुवन कुलकर्णी, मा. अपर जिल्हाधिकारी, बीड यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भेसळ प्रतिबंधक समितीने संयुक्त पथकामार्फत जिल्हयात विविध दुध संकलन केंद्रावर जावुन दुध व दुग्धजन्य पदार्थाची तपासणी करण्यात आलेली आहे. सदर तपासणी धडक मोहिमे अंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत संशयास्पद आढळुन आलेले दुध व दुग्धजन्य पदार्थाचे एकुण 37 नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. तसेच मोहिमे अंतर्गत अंबाजोगाई येथील रामदास त्रिंबक डेंगे यांचे 231 लिटर दुध,आष्टी तालुक्यातील हाजीपुर येथील कानिफनाथ खाजगी दुध संकलन केंद्राचे 258 लिटर दुध, ब्रम्हगाव येथील संत वामनभाऊ या खाजगी दुध संकलन केंद्राचे 1798 लिटर दुध, जय हनुमान या खाजगी दुध संकलन केंद्राचे 738 लिटर दुध असे एकुण 3025 लिटर दुधाची तपासणी केली असता ते संशयास्प्‍द आढळुन आल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नष्ट करण्यात आले. तसेच गेवराई तालुकयातील बेंगलोर स्वीटस मधील जप्त केलेले 23 किलो खवा नाशवंत व संशयास्पद असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नष्ट करण्यात आला.

अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कानिफनाथ दुध संकलन केंद्र,हाजीपुर व संत वामनभाऊ दुध संकलन केंद्र ब्रम्हगाव ता.आ्ष्टी या दुध संकलन केंद्राचा अन्न परवाना नसल्यामुळे व्यवहार बंद करण्याबाबत सुचना दिल्या.

वैधमापन शास्त्र विभागामार्फत आष्टी तालुका दुध संघ म.आष्टी या केंद्रातील वजन काटा प्रमाणीत नसल्यामुळे संघावर कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच कानिफनाथ- हाजीपुर व संत वामनभाऊ- ब्रह्मगाव या खाजगी दुध संकलन केंद्रावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी या कार्यालयातील पथकामार्फत 20 दुध संस्थाची तपासणी करण्यात आली असुन 2222 लिटर कमी प्रत,वास चवीचे दुध संस्था स्तरावर परत करण्यात आले आहे. याबाबत दुग्ध्‍ संस्थाना कमी प्रत,वास चवीचे व भेसळयुक्त दुध न स्विकारण्याबाबत सक्त्‍ सुचना देण्यात आल्या आहेत.

वरील जिल्हास्तरीय समिती मार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थाचे भेसळ करणा-या विरुध्द धडक मोहिम राबविण्यात येत असुन सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, आपले जवळपास दुध व दुग्धजन्य पदार्थाचे भेसळीचे प्रकार घडत असल्यास आपण जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी बीड या कार्यालयाकडे संपर्क साधावा.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles