19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

40 आमदारांना अपात्र घोषित करा, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे याचिका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून गेलेल्या 40 जणांना अपात्र घोषित करा अशी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगासमोर केली आहे. अजित पवार गटाने मूळ पक्ष आणि चिन्हावर सांगितलेला दाव्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला आपले उत्तर कळवले आहे.

अजित पवार गटाने लावलेले सगळे आरोप या उत्तरात फेटाळून लावण्यात आले आहे. या उत्तरासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जणांना अपात्र घोषित करण्याची याचिकाही दाखल केली आहे.

 

अजित पवार यांनी 30 जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या एका याचिकेत, आपणच पक्षाचे प्रमुख आहोत, त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह आपल्याला देण्यात यावे, अशी विनंती केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या नोटीसला आपले उत्तर दिले आहे. हे उत्तर सादर करण्यासाठी 3 आठवड्यांचा वेळ देण्यात आला होता. 9 सप्टेंबरच्या आता राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर सादर करायचे होते. आज जी20 च्या बैठकीमुळे दिल्लीतील बहुतांश कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे, यामुळे निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे.

 

अजित पवार गटाकडून करण्यात आलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहे. अजित पवारांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा, पक्ष आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता तो शरद पवार गटाने फेटाळला आहे. 2022 मध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती त्याची देखील काही पुरावे देण्यात आल्याची माहिती आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles