0.4 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

अवैध विवाहातून झालेल्या मुलांना पालकांच्या संपत्तीवर हक्क मिळणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

अवैध लग्नातून झालेल्या मुलांचा त्यांच्या पालकांच्या संपत्तीवर हक्क असेल असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे हिंदू विवाह कायद्यानुसार दुसऱ्या लग्नातून झालेल्या किंवा लग्नाशिवाय झालेल्या मुलांना पालकांच्या संपत्तीमध्ये संपूर्ण हक्क मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महत्वपूर्ण असून हिंदू विवाह पद्धतीविषयी मार्गदर्शक आहे.

 

पहिली पत्नी किंवा पती असताना दुसरा विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार अवैध ठरतो. अशा प्रकरणातील मुलांना फक्त पालकांच्या संपत्तीवर हक्क मिळू शकत होता. त्यांना पालकांना वारशाने मिळणाऱ्या संपत्तीवर हक्क सांगता येत नव्हता. यामुळे दुसरी पत्नी किंवा पतीपासून झालेल्या मुलांबाबत कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली. कोर्टाने यासंदर्भात महत्त्वाचा निकाल दिला असून आता प्रकरणातील मुलांनाही आपल्या पालकांना वारशाने मिळणाऱ्या संपत्तीतील वाटा मिळणार आहे.

 

 

हिंदू वारसदार कायद्यानुसार अमान्य लग्नातून झालेली मुलं आपल्या पालकांच्या संपत्तीवर दावा सांगू शकतात. हिंदू विवाह कायदा 1955 कलम 16(3) नुसार, अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलांना वैधता दिली जाते. पण, कलम 16(3) नुसार अशा मुलांना फक्त पालकांच्या संपत्तीतील वाटा मिळतो. त्यांना पितृसत्ताक संपतीवर अधिकार मिळत नाहीत.

 

अवैध लग्नातून झालेल्या संततीला पालकांना वारशाने मिळालेल्या संपत्तीवर हक्क असेल का? अशी विचारणा करणारी याचिका सुप्रीम कोर्टात २०११ मध्ये करण्यात आली होती. रेवणसिद्दापा विरुद्ध मल्लिकार्जून या खटल्यावर सुनावणी करताना मागील महिन्यात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. हिंदू कायद्यानुसार, अवैध लग्नामध्ये जोडप्यांना पती-पत्नी असा दर्जा असत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयानुसार मुलांना आता पालकांच्या तसेच वारसाने मिळालेल्या संपत्तीवरही हक्क मिळेल.

 

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles