18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं १३ वर्षांनी एकत्र रक्षा बंधन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राखी पौर्णिमा मुंडे कुटूंबासाठी खास राहिली. कारण, यंदा धनंजय मुंडे यांच्या तिन्ही बहिणींनी त्यांना राखी बांधली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईत आज आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली.

या निमित्ताने २००९ नंतर प्रथमच पंकजा व धनंजय मुंडे यांनीएकत्रित राखीबंधन साजरे केले. यावेळी प्रज्ञा मुंडे देखील उपस्थित होत्या. तत्पूर्वी पंकजा मुंडेंनी आज नांदेडला जाऊन रेणुका मातेचं दर्शन घेतलं.

 

राखी पौर्णिमेचा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येक जण आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहे. राखी पौर्णिमेला मुंडे घराण्यातील बहिण-भावाची चर्चा होत असते. राजकारणात एकमेकांचे विरोधक असणारे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे १३ वर्षांनी पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले.

 

 

दरम्यान आज देशभरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरं केलं गेलं. रक्षाबंधन सणानिमित्त आमदार रोहित पवार यांनी मंत्रालयात ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. रोहित पवार म्हणाले की,दरवर्षी आमच्या पुढच्या पिढीचं सकाळीच रक्षाबंधन होत असतं. परंतु यावर्षी ते झालेलं नाही.रोहित पवार म्हणाले की, संध्याकाळपर्यंत कधीही रक्षाबंधन होईल, मात्र संध्याकाळीही रक्षाबंधन झाल्याचे वृत्त नाही. अजित पवारांच्या बंडाचे राष्ट्रवादीबरोबरच पवार कुटूंबातही तडे गेल्याचे चित्र आहे.

 

 

राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व असे बदल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर राजकारणात वेगळीच रंगत आली आहे. त्यातच, दोन महिने राजकारणापासून अलिप्त राहण्याची घोषणा केलेल्या पंकजा मुंडे पुन्हा पक्षात सक्रीय झाल्या आहेत. शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles