20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

तीन राज्यांत भाजपला फटका बसणार ! सी वोटरने वर्तवला अंदाज.. महाराष्ट्रात मिळणार इतक्या जागा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

येत्या 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे. त्यासाठीच या पक्षाने गेल्या दहा वर्षांपासून विस्मृतीत गेलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पुनरूज्जीवनही केले आहे.

तर भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधी पक्षांची एक भक्कम इंडिया नामक आघाडी आकाराला आहे. आता नक्की काय होणार आणि कोणाची सरशी होणार याचा अंदाज बांधला जात असताना तीन महत्वाच्या राज्यांमध्ये भाजपला किमान 54 जागांचा फटका बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रात 20 जागा

इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा दावा केला आहे. महाराष्ट्र, बिहार आणि प. बंगाल या तीन राज्यांमध्ये भाजपचे नुकसान होत असल्याचे दावे केले जात आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या राज्यात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 41 जागा मिळाल्या होत्या. आता 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेल्या पाहणीत रालोआला निम्मेपेक्षा कमी जागा म्हणजे 20 जागा मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित 28 जागा इंडियाच्या वाट्याला जातील. मतांची टक्केवारी पाहता रालोआला 43 तर इंडियाला 47 टक्के मते मिळण्याची शक्‍यता आहे.

 

बिहारमध्ये 14 जागा

बिहार या राज्यातून 40 खासदार लोकसभेवर पाठवले जातात. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पार्टीची बिहारमध्ये युती होती आणि 2019 च्या निवडणुकीत या युतीला 40 पैकी 39 जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेसला एकमात्र जागेवर समाधान मानावे लागले होते. मात्र आता नितीश यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस यांच्यासोबत आहे. त्याचा भाजपला फटका बसण्याची चिन्हे असून आगामी निवडणुकीत या पक्षाला केवळ 14 जागांवर समाधान मानावे लागेल. 26 जागांवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार विजयी होतील असे भाकित वर्तवले गेले आहे.

 

बंगालमध्ये जैसे थे

प. बंगालमध्ये विधान सभा निवडणुकीत भाजपला अपयश आले आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने भाजपला धूळ चारली. मात्र भाजपने यावेळी ममतांची चांगली दमछाक केली होती. तोच प्रकार 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही झाला होता. भाजपचे 18 खासदार राज्यात निवडून आले होते. आताच्या सर्वेक्षणातील स्थितीनुसार भाजपच्या येथील जागा वाढत नसल्यातरी भाजपला येथे नुकसान होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अनुमान आहे. म्हणजे त्यांच्या आहे तेवढ्या जागा कायम राहणार आहेत. इंडिया आघाडीला 24 जागा मिळण्याची शक्‍यता आहे.

 

ममता, केजरीवालांना राहुल यांची मात

26 विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या इंडिया आघाडीचे नेतृत्व कोणी करावे याचीही चाचपणी करण्यात आली आहे. त्याचे कारण जर इंडियाला बहुमत मिळालेच तर पंतप्रधान कोण होणार हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे. या सर्वेक्षणासाठी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी ही तीन नावे समोर ठेवण्यात आली होती. यात राहुल यांनी अन्य दोन नेत्यांना मात दिली आहे. इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी 24 टक्के लोकांची राहुल यांना पसंती आहे तर अन्य दोन नेत्यांना समसमान म्हणजे 15 टक्के मते मिळाली आहेत.

 

दरम्यान, भारत जोडो यात्रा आणि राहुल गांधी यासंदर्भातीलही कौलही अजमावण्यात आला. त्यानुसार भारत जोडो यात्रेचा राहुल यांची प्रतिमा सुधारण्यासाठी लाभ झाला असल्याचे मत 44 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. 33 टक्के लोकांच्या मते या यात्रेनंतरही राहुल यांच्या प्रतिमेत कोणताही बदल झालेला नाही. तर 13 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार भारत जोडोनंतरही राहुल यांची प्रतिमा अधिकच खराब झाली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles