20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

दूध भेसळखोरांवर कडक कार्यवाही करण्याचे तुकाराम मुंडे यांचे आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

राज्यातील दुध व दुधजन्य पदार्थामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाने सध्या राज्यभर जिल्हा निहाय कारवाईची धडक मोहीम हाती घेतली असून.राज्याचे दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी याबाबत कठोर भुमिका घेतली असून विभागातील अधिकाऱ्यांची जिल्हा निहाय पथके तयार करुन दुधात भेसळ करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.त्यामुळे दुग्धव्यवसाय विकास विभाग दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आलेला आहे.

 

राज्यात दुधात व दुग्धजन्य पदार्थात होणाऱ्या भेसळी बाबत वारंवार तक्रारी मंत्रालय स्तरावर प्राप्त होत आहेत.अशा दुधातील भेसळ रोखण्यासाठी मंत्रालयात तुकाराम मुंढे, सचिव, दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपुर्ण बैठक झाली.या बैठकीस दुग्धव्यवसाय विकास आयुक्त शिपुरकर, उपायुक्त श्री. मोहोड यांच्यासह राज्यातील प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी उपस्थीत होते.या बैठकीत भेसळखोरांवर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्याची माहिती दुग्ध आयुक्तालयातुन देण्यात आली आहे.

 

दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातुन जिल्हावार संयुक्त भरारी पथकाव्दारे धडक मोहीम राबवुन दुधात भेसळ करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना सचिव तुकाराम मुंढे यांनी दिल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा गैरप्रकार झाल्यास संबंधीत अधिकाऱ्यावरही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles