20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पुढील वर्षापासून दहावी बारावीच्या परीक्षा या दोन टप्प्यात होणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

दहावी बारावीची परीक्षा देण्याचे टेन्शन हे त्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या आई-वडिलांना जास्त येते. कारण या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेसाठी अनेक विषय आणि मोठा अभ्यासक्रम असतो. परंतु आता कोणीही टेन्शन घेण्याचे कारण नाही, कारण पुढील वर्षापासून दहावी बारावीच्या परीक्षा या दोन टप्प्यात होणार असून विद्यार्थ्यांचा ज्या विषयाचा अभ्यास झाला असेल, त्यापैकी निम्मे विषय पहिल्या सत्रात आणि उर्वरित निम्मे विषय दुसऱ्या सत्रात अशा प्रकारे दोनदा परीक्षा देण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण हलका होणार आहे.

 

त्याचप्रमाणे बारावीत विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधील कोणतेही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे त्यामुळे आतापर्यंत कला वाणिज्य आणि विज्ञान अशा विभागांच्या भिंती उभारण्यात आले होत्या. आता एक प्रकारे या भिंती पाडल्या जाणार असून सर्व विषयांचे एकत्रीकरण करून कोणत्याही आवडीच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना यश संपादन करता येणार आहे इतकेच नव्हे तर अभ्यासक्रमासाठी एक भारतीय भाषा आणि एक परकीय भाषा अशा दोनच भाषा विषय घेण्याचे देखील स्वातंत्र्य असणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या या निर्णयाचे आता शैक्षणिक क्षेत्रावर काय परिणाम होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण हा निर्णय आता पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जुन २०२४ पासून अंमलात येणार आहे.

 

नवीन अभ्यासक्रम आराखडा

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून बोर्ड परीक्षासंदर्भात मोठा बदल होणार आहेत. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा आता दोन टप्प्यात होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सदर अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणासाठी आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील व विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण टिकवून ठेवण्याचा पर्याय असेल. तसेच विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीत विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल.

 

नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार ११वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल आणि यापैकी किमान एक भाषा भारतीय असावी. विशेष म्हणजे आता २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहे. त्याशिवाय बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात होणार आहेत. विद्यार्थांचा काही विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचे स्वातंत्र्यही देण्यात येणार आहे.

 

विद्यार्थ्यांचा ताण

खरे म्हणजे बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोन टप्प्यात होणार आहे. विद्यार्थी दोन्ही वेळा परीक्षा देऊ शकतात, सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जातील. टप्प्या टप्प्याने अर्ध्या अर्ध्या विषयांची परीक्षा देऊ शकतील. यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण हलका होणार आहे, कारण ज्या विषयांचा अभ्यास झाला त्याची परीक्षा देऊन झाली की उर्वरित विषयांचा अभ्यास त्यांना करता येणार आहे, नवी पिढी आनंदात शिकावी त्यांच्यावर कोणतेही मानसिक ताण तणाव येऊ नयेत, काही वेळा दहावी बारावीचे विद्यार्थी आत्महत्या करतात, या प्रकाराला त्यामुळे आळा बसणार आहे.

 

नवी पाठ्यपुस्तकेही

तसेच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार आहे आणि त्यावर आधारित, २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जातील. दीर्घकाळासाठी सर्व मंडळांनी सेमिस्टर किंवा नियतकालिक पद्धतीचा अवलंब करावा. विज्ञान व इतर विषयांचे मूल्यमापन कामगिरीवर आधारित म्हणजेच प्रयोगाशी जोडलेले असावे. सध्याच्या कठीण बोर्ड परीक्षेतून विद्यार्थांना दिलासा देण्यासाठी परीक्षेची सोपी पद्धत तयार करण्यात आली आहे. शिक्षणाच्या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आकलन आणि यशाचे मुल्यांकन करता येईल. पूर्वी परीक्षेसाठी वर्षभर झटावे लागत होते. पण आता सर्वांना समान संधी मिळेल.

 

पुरेसा वेळ व संधी

नव्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ व संधी मिळणार आहे. तसेच अकरावी-बारावीसाठी विषयांची निवड विद्याशाखानिहाय नसेल. कोणताही हा विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य एकत्र विषय निवडू शकतो. त्यामुळे यापुढे कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखा असा पारंपारिक प्रकार किंवा मार्ग राहणार नाही. कोणतेही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles