मुंबई |
राज्यातल्या जनतेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आज सरकट मोफत उपचार देण्याची घोषणा करून एक क्रांतिकारक निर्णय घेतला. आज मंत्रिमंडळाने एकमताने यावर निर्णय घेतला.
या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्नित राज्यातील सर्व २ हजार ४१८ आरोग्य संस्थांचा समावेश असणार आहे.
याठिकाणी पूर्वी केसपेपर काढण्यासाठी आणि नंतर उपचारासाठी रुग्णांना बराच वेळ वाट पाहत बसावं लागत होतं. आता हा वेळ वाचणार आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये सर्व उपचार व तपासण्या सरसकट मोफत केल्या जाणार आहेत
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण करत असताना महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तसेच शून्य करण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
“येत्या 15 ऑगस्ट पासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तशा स्पष्ट सूचना सर्व आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला दर्जेदार चांगले व निरोगी जीवन जगण्यासाठी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. या क्रांतिकारी निर्णयामुळे यापुढे महाराष्ट्रातील जनतेला सर्व तपासण्या, रक्त चाचण्या, सर्व डायग्नोस्टिक सेवा अगदी मोफत मिळतील.”
– प्रा डॉ तानाजी सावंत, आरोग्य मंत्री


                                    