13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

वैद्यकीय प्रवेशाच्या नोंदणीसाठी सोमवार पर्यंत वाढीव मुदत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

‘नीट’ परीक्षेच्‍या आधारे वैद्यकीय विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. ३१)पर्यंत संकेतस्‍थळावर नोंदणी करून पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल.

 

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यावर दीर्घ कालावधीपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नव्‍हती. काही दिवसांपूर्वीच नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. त्‍यातच नोंदणीची मुदत संपत असताना ही मुदत वाढविण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.

 

सुधारित वेळापत्रकानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सोमवारी दुपारी बारापर्यंत मुदत असेल. याच दिवशी दुपारी दोनपर्यंत निर्धारित शुल्‍क ऑनलाइन माध्यमातून अदा करता येईल. सायंकाळी पाचपर्यंत विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची स्‍कॅन कॉपी अपलोड करायची आहे.

 

एमबीबीएस, बीडीएससाठी ४ ऑगस्‍टला पहिली निवड यादी

 

प्रवेशप्रक्रियेच्‍या पुढील टप्प्‍यात १ ऑगस्‍टला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी इच्‍छुक विद्यार्थ्यांना त्‍यांचे प्राधान्‍यक्रम नोंदविण्यासाठी १ ते ३ ऑगस्‍ट अशी मुदत असेल. पहिल्‍या फेरीसाठीची निवड यादी ४ ऑगस्‍टला जाहीर केली जाणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ५ ते ९ ऑगस्‍ट अशी मुदत असणार आहे.

 

आयुष अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाचे वेळापत्रक असे

 

आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी ४ ते ९ ऑगस्‍टदरम्‍यान मुदत दिली जाणार आहे; तर निर्धारित शुल्‍क भरण्यासाठी १० ऑगस्‍टपर्यंत संधी असेल.

 

११ ऑगस्‍टपर्यंत सर्व कागदपत्रांची स्‍कॅन कॉपी विद्यार्थ्यांनी अपलोड करायची आहे. या अभ्यासक्रमांकरिता प्रारूप गुणवत्ता यादी १३ ऑगस्‍टला जाहीर केली जाईल. यानंतर प्रवेश फेऱ्यांचे सविस्‍तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles