20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित; तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर ठरणार पालकमंत्री

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडली. अजित पवार यांच्यासह आणखी आठ आमदारांनी शिवसेना-भाजप यांना पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या सरकारमध्ये अनेक बदल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारे अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे आले, त्यानंतर शिवसेना-भाजप पक्षातील नेत्यांकडे असणारी अनेक खाती देखील अजित पवार गटातील नेत्यांकडे आली आहेत. त्याचप्रमाणे आता राज्यात तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर लवकरच काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिलं जाणार असल्याची माहीती समोर आली आहे. राज्यातील तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर काही जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांच्या पदाची अदलाबदल केली जाणार आहे. यामध्ये बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहीती आहे.

नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र कोल्हापूरचे पालकमंत्रीपदासाठी नव्याने सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री हसन मुश्रीफ हे देखील इच्छुक आहेत.

त्यामुळे पालकमंत्री पदावरून पून्हा एकदा सरकारमधील मंत्र्यांमध्ये तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हे धर्मराव बाबा अत्राम यांना तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहीती आहे.

 

पुणे जिल्ह्यात आपला गट मजबूत करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद हवे असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांचे सर्वाधिक लक्ष पुण्याकडे आहे. विरोधात असताना ते पुण्यात सतत बैठका घेत होते. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांना अजित पवारच पालकमंत्री हवेत. मात्र या मागणीला भाजपकडून विरोध होऊ शकतो. त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles