20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पीएम किसान योजनेतील लाभार्थींना एका क्लिकवर 14 व्या हप्त्याचे गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन वेबलिंकद्वारे या ‘किसान संमेलना’स सहभागी होण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आवाहन
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

 

मुंबई |

 

देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 27) सकाळी 11 वा. राजस्थान मधील सीकर येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘पीएम किसान संमेलन’ कार्यक्रमाच्या निमित्ताने पीएम किसान सन्मान योजनेतील 8.5 कोटी लाभार्थींच्या खात्यावर पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याची रक्कम एका क्लिक द्वारे वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वेबलिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2019 साली शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. याद्वारे देशातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपयांचे अर्थसहाय्य तीन हप्त्यात देण्यात येते.

 

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 2 हजार रुपयांचे एकूण 13 हप्ते 11 कोटी शेतकऱ्यांना अशी एकूण 2 लाख 42 हजार कोटी रुपये रक्कम आतापर्यंत वितरित करण्यात आली असून, गुरुवारी 14 व्या हप्त्यापोटी साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 हजार कोटी रुपये निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या किसान संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

 

या कार्यक्रमात राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वेबलिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

 

किसान संमेलनाची वेबलिंक – http://pmevents.ncog.gov.in/

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles