13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी खोटी कागदपत्रे जोडणाऱ्यांना मोठा दणका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जे करदाते इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करतील त्यांच्यावर आयकर विभाग कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. खोट्या दस्तावेजांच्या यादीत खोटे भाडे करार, होम लोकसाठी अतिरिक्त दावे, दानाशी निगडित खोटी कागदपत्रे, यांचा समावेश आहे.आयकर विभागाने रिटर्न्समध्ये गफलत झाल्यास या करदात्यांविरोधात कारवाई करत नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला उत्तर देण्याचीही मागणी केली आहे.

आयकर विभागाने या करदात्यांना कर सवलतीचा दावा करण्यासाठी पुरावे म्हणून हे दस्तावेज मागितले आहेत. त्याशिवाय आयकर विभागाने करदात्यांकडून आयटीआर तयार करणाऱ्या तसेच दाखल करणाऱ्या सीए अथवा कर विशेषतज्ज्ञांचे नाव, पत्ता आणि संपर्काचा खुलासा करण्यासही सांगितले आहे.

तंत्रज्ञांच्या मदतीने आकड्यांची जुळवाजुळव

कर तज्ज्ञांनुसार, आयकर विभाग यावेळी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञांच्या मदतीने विभिन्न स्त्रोतांकडून खोट्या माहितीची पडताळणी केली जात आहे. घर मालकांनी आपल्या रिटर्न्समध्ये भाड्याच्या रक्कमेचे डिटेल्स दिलेले नसतील तर एआयद्वारे ते पकडले जाण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा या कामासाठी खूप वेळ लागत होता. छोट्या रक्कमेच्या दाव्यांची पडताळणी कोण करणार यासाठी ते खोटे कागदपत्र सादर करत होते.

आठ हजार लोकांना नोटीस जारी

आयकर विभागाने दान देणाऱ्या दानशूर लोकांचीही चौकशी सुरू केली आहे. याअंतर्गत धर्मादाय संस्थांकडून सादर केलेल्या रिटर्न्समध्ये दाखल केलेल्या आकडेवारीची पडताळणी केली जात आहे. त्यानुसार, दानच्या नावावर कर चोरी करणाऱ्या ८ हजार लोकांना नोटीस जारी केली आहे. नोटीस पाठवणाऱ्यांमध्ये कंपन्या, व्यावसायिक, करदाते यांचा समावेश आहे.

एआयएसची मदत घ्या.

वार्षिक सुचना रिपोर्ट सुविधा नुकतीच आयकर विभागाने सुरु केली आहे. त्याच्याशी संबंधित आर्थिक वर्षादरम्यान चुकवण्यात आलेल्या व्यवहारांचा समावेश आहे. यात एकूण कराशिवाय वार्षिक उत्त्पन्न, किती भाडे मिळाले, बँक बॅलन्स, किती रक्कम काढली गेली किंवा किती रक्कम भरण्यात आली, क्रेडिट अथवा डेबिट कार्ड, लाभांश, बचत खात्यांवरील व्याज, शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स, परदेश यात्रा, संपत्तीची खरेदी विक्री, दीर्घकालीन परतावा, रिफंडसहित ४६ प्रकारच्या सुचनांचा समावेश आहे. ही माहिती आयकर विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याचा उपयोग रिटर्न्स भरुन पडताळणी करण्यासाठीही वापरला जाऊ शकतो.

आयटीआरमध्ये या बाबींचा खुलासा जरुर करा

– पाल्यांची माहिती द्या

– बचत खात्यातून मिळालेल्या व्याजाची माहिती

– कोणत्याही गुंतवणूकीतून मिळणारे लाभ

– इतर उत्पन्नाचे व्याज

– परदेशातील गुंतवणूकीची माहिती

श्रेणीनुसार आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत

– करदाते तसेच व्यक्तिगत तसेच छोटे करदात्यांसाठी ३१ मार्च

– ज्या व्यापाऱ्यांच्या खात्यांच्या आॅडिट्सची गरज आहे त्यांच्यासाठी ३१ आॅक्टोबर

– आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत व्यवसायासाठी ३० नोव्हेंबर

– सुधारित आयटीआर दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबर

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles