19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला राज्यात सोमवारपासून सुरवात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी सोमवारपासून (ता. २४) नोंदणी करता येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून यासंबंधीची माहिती दिली आहे. नीट परीक्षेचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरी सीईटी सेलकडून राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू केले जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. अखेर सीईटी सेलकडून रविवारी प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली. मात्र, त्यापुढील गुणवत्ता यादी कधी प्रसिद्ध होणार, समुपदेशन फेऱ्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नाही.

पात्र विद्यार्थ्यांना cetcell.net.in/NEET-UG-2023 या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल. लिंक सक्रिय झाल्यावर उमेदवारांना समुपदेशना संदर्भातील तपशीलवार वेळापत्रक, माहितीपत्रक आणि इतर माहिती उपलब्ध होऊ शकेल. नीट युजी अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ऑल इंडिया कोटा (एआयक्यू) जागांवर पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया शनिवारपासून (ता. २२) सुरू झाली आहे. नीट युजी अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ऑल इंडिया कोटा जागांवर प्रवेशासाठी या वर्षी चार फेऱ्यांमध्ये समुपदेशन होणार आहे. प्रत्येक फेरीच्या नोंदणीनंतर, उमेदवारांना उपलब्ध पर्यायांच्या यादीतून महाविद्यालये निवडून त्यांची पुष्टी करावी लागेल. त्यानुसार उमेदवारांची पडताळणी आणि जागावाटप केले जाईल.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles