2.5 C
New York
Wednesday, December 10, 2025

Buy now

spot_img

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी आमदार नमिता मुंदडांची विधानसभेत लक्षवेधीद्वारे मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई |

बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा स्वतंत्र जाहिर करावा, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी आज विधानसभेत केली.

मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेत लक्षवेधीद्वारे आमदार नमिता मुंदडा यांनी बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करण्याची मागणी केली.

 

यावेळी आ. मुंदडा म्हणाल्या, बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करावा, अशी येथील नागरिकांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीसाठी अंबाजोगाईकर मागील ३५ वर्षांपासून विविध माध्यमातून लढा देत आहेत. तरीही या मागणीचा शासन दरबारी गांभीर्याने विचार झाला नाही.

दरम्यान, या मागणीसाठी स्व.विमलताई मुंदडा यांनीही विविध माध्यमातून आंदोलन केले. त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झाल्यानंतर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पुरक असणारे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूसंपादनाची तीन कार्यालये अंबाजोगाईत कार्यान्वित झाली. ही सर्व कार्यालये आज स्वतंत्र व सुसुज्ज इमारतीत उभी आहेत. त्यामुळे अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी लागणारा अतिरिक्त खर्च ही कमी होणार आहे. अंबाजोगाईकरांच्या मागणीला न्याय द्यावा, अशी मागणी आ. मुंदडा यांनी केली.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles