15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

इनाम जमिनीचे बनावट कागदपत्रे  तयार करुन जमिनीची खरेदी विक्री केल्याप्रकरणी 6 बडया शासकीय अधिकाऱ्यांसह 38 जणांवर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर  |

महार वतन हाडोळा इनाम जमिनीचे बनावट कागदपत्रे  तयार करुन या जमिनीची खरेदी विक्री केल्याप्रकरणी अहमदनगरचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार,  सहाय्यक दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी  तलाठ्यासह  एकूण 38 जणांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  गुन्हा  दाखल केला आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

 

नगर शहराजवळील वडगाव गुप्ता  शिवारातील (गट क्रमांक 203 क्षेत्र 2 हेक्टर 97 आर) एक हेक्टर 34 आर ही कनिष्ठ महार वतन हाडोळा इनाम वर्ग 6 ची जमीन आहे. ती जुन्या शर्तीवर करण्यासाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसीलदार यांनी बेकायदेशीर परवानगी दिली. त्यास तहसीलदार एन.एन. पाटील, तलाठी, एल.एस. रोहकले,  तत्कालीन मंडल अधिकारी दुर्गे यांनी मदत केली. तसेच जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या नियमबाह्य फेरफार नोदी घेऊन उत्कर्ष पाटील व अजित कड यांना मदत केली.

तत्कालीन अपर जिल्हाधिकारी व्ही.टी. जरे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुठे यांना याचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती होती. तरी देखील त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक दिलीप बबन निराली  यांनी खरेदी-विक्रीचे बेकायदेशीर दस्त नोंदवून घेतेल्याचे तक्रारी अर्जात नमूद केले आहे.

 

ही जमीन महार वतन हाडोळा इनाम वर्ग 6 ब ची असल्याची माहिती असताना या सर्वांनी मिळून जमिनीचे खोटे कागदपत्र तयार केली. तसेच जमिनीच्या खरेदी-विक्रिचा व्यवहार करुन शासनाची फसवणूक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासह एकूण 38 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसीबीचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे करीत आहेत.

 

गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे

तत्कालीन तहसिलदार अहमदनगर एल.एन. पाटील, तत्कालीन तलाठी सजा वडगाव गुप्ता एल.एस. रोहकले, तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगाव ता.जि. नगर दुर्गे, तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर व्ही. टी. जरे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर राजेंद्र मुठे, तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक अहमदनगर-2 दिलीप बबन निराली

 

जमिनीचे भोगवाटादार – दिनकर आनंदा शिंदे, विनायक शंकर शिंदे, बाबु आनंदराव शिंदे, मोहन आनंदराव शिंदे, वामन किसन शिंदे, यादव किसन शिंदे, सदाशिव केशव शिंदे, रामभाऊ केशव शिंदे, सुनिल केशव शिंदे, यादव केशव शिंदे, मालनबाई केशव शिंदे, लता शांतवण भाकरे, अरुण दगडु शिंदे, शालनबाई दगडु शिंदे, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, मथुरा विष्णु शिंदे, संदिप विष्णु शिंदे, सुनिता रतन गायकवाड, नंदा शाम घाटविसावे, शालुबाई शाहुराव प्रभुणे, मच्छिंद्र आनंदराव शिंदे, लिलाबाई चंद्रभान पाडळे, शोभा बुद्धीराम ठाकुर

 

संमती देणारे – वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, सुशिला शांतवण घाटविसावे, तुळसाबाई मारुती नरवडे, छबुबाई भिवाजी साळवे, इंद्रायणी विठ्ठल जाधव, वत्सला वामन जाधव, कौसल्या दामु जगताप,

जनरल मुखत्यार – उत्कर्ष सुरेश पाटील (रा. श्रमिकनगर, अहमदनगर) जमीन खरेदी करणारे अजित कचरदास लुंकड(रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर) यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर येथे बुधवारी (दि. 19) भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, आयपीसी 167. 420, 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार ) यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, पोलीस अंमदार संतोष शिंदे, रविंद्र निमसे, विजय गंगुले यांच्या पथकाने केली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles