2.8 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

आष्टीच्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे हा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट बनला. पोलंडच्या चोरझो येथे झालेल्या सिलेसिया डायमंड लीग २०२३ ॲथलेटिक्स मीटमध्ये अविनाशने ८:११.६३ सेकंदाची वेळ नोंदवली आणि या कामगिरीसह त्याने ऑलिम्पिक पात्रतेच्या ८:१५.००सेकंदाच्या आतील वेळ नोंदवली.त्यामुळे तो पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला.

 

केनियाचा अब्राहम किबिवोट ज्याने गतवर्षी राष्ट्रकुल २०२२ चे सुवर्ण जिंकले त्याने ८:०८.०३ सह दुसरे स्थान पटकावले तर विद्यमान ऑलिम्पिक, जागतिक आणि डायमंड लीग चॅम्पियन, मोरोक्कोच्या सौफियाने एल बक्कलीने ८:०३.१६ च्या विक्रमी वेळेसह शर्यत जिंकली. ऑलिम्पिक पात्रता कालावधी १ जुलै २०२३ रोजी सुरू झाला आणि ३०जून २०२४ पर्यंत सुरू राहील.

 

डायमंड लीग फायनल २०२३ च्या रनअपमध्ये साबळेने सिलेसिया येथे तीन पात्रता रँकिंग गुण मिळवले आणि आता सात गुणांसह ते नवव्या स्थानावर आहे. डायमंड लीग २०२३ मधील साबळेचा हा तिसरा सामना होता आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तो राबात लेग क्लॉकमध्ये ८:१७.१८ सह १०व्या आणि स्टॉकहोम लेगमध्ये ८:२१.८८ वेळेसह पूर्ण करत पाचव्या स्थानावर राहिला.

अविनाश हा सहावा आणि पहिला ट्रॅक अ‍ॅथलीट ठरला

अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा सहावा भारतीय आणि देशातील पहिला ट्रॅक अ‍ॅथलीट ठरला. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीयांच्या यादीत तो पुरुषांच्या स्पर्धेत अक्षदीप सिंग, विकास सिंग आणि परमजीत सिंग बिश्त या चार २० किमी रेस वॉकरसह आणि महिलांच्या स्पर्धेत प्रियांका गोस्वामी आणि लांब उडीपटू मुरली श्रीशंकर यांच्यासह त्याने तो ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे.

 

अविनाशविषयी थोडक्यात

अविनाश हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या मांडवा गावचा रहिवासी आहे. लहानपणी अत्यंत कष्टातून त्याने धावण्याचे प्रशिक्षण घेतले. सैन्यात भरती झाल्यानंतर तो भारतासाठी अनेक स्पर्धांमध्ये चमकला. मागील वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तो अगदी थोड्या फरकाने अंतिम फेरीसाठी पात्र होण्यापासून राहिला होता. मात्र, त्यावेळी ते अपयश त्याने आता भरून काढले आहे. आता भारताला त्याच्याकडून ऑलिम्पिकमध्ये अपेक्षा असतील.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles