-1.8 C
New York
Saturday, January 11, 2025

Buy now

spot_img

आ.बाळासाहेब आजबे यांचा आरोपांचा बार फुसका. दीड गुंठ्यात चार नातेवाईक अर्धवट माहितीद्वारे दिशाभूल-आ.सुरेश धस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

खुंटेफळ साठवण तलावावरून आष्टीत रंगला कलगीतुरा 

आष्टी  | प्रतिनिधी

आ.बाळासाहेब आजबे यांनी खुंटेफळ साठवण तलावातील संपादित जमिनीतील माझ्या चार नातेवाईकांची नावे सांगितली परंतु त्यांचे क्षेत्र का सांगितले नाही ? आ.बाळासाहेब आजबे अर्धवट माहिती सांगतात त्यांनी पूर्ण माहिती घ्यावी त्यांना खुंटेफळ साठवण तलावा बाबतची काहीच माहिती नसल्यामुळे चुकीचे आरोप करतात असा प्रतिहल्ला आ.सुरेश धस यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, आ.बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुंटेफळ तलावातील चार नातेवाईकांची नावे सांगितली त्यातील गणेश शिंदे, महेश शिंदे आणि नवनाथ शिंदे ह्या तिघांचे नावावर एक गुंठा म्हणजे १००० स्क्वेअर फुट, १०० चौरस मीटर सामाईक मालकी असून मोहन हौसराव झांबरे यांच्या नावावर अर्धा गुंठा म्हणजे ५०० स्क्वेअर फुट एवढेच क्षेत्र आहे असे असताना आमदार साहेबांनी या क्षेत्राचा उल्लेख का केला नाही ?

कारण त्यांचा केवळ बदनामी करण्याचाच उद्देश होता खुंटेफळ साठवण तलाव भूसंपादन क्षेत्रातील गावे ही बहुतांशी मराठा समाजाची आहेत. प्रकल्प होत असल्याने शासनाच्या धोरणानुसार प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळेल या आशेमुळे शेतकऱ्यांनी जमिनीची खातेफोड केलेली आहे.. या तलावातील मूळ खातेदार केवळ ४०० असून खाते फोड झाल्यामुळे ७०० झाले आहेत

खुंटेफळ येथील ३०० खातेदारांचे ६०० खातेदार झाले आहेत.कारण,शासकीय धोरणानुसार त्यांना राहण्यासाठी प्लॉट आणि २०० स्क्वेअर फुट जमीन संपादित करण्यात आली तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळू शकते तसेच इतर फायदे मिळू शकतात या आशेमुळे या गोरगरीब शेतकऱ्यांनी खातेफोड केलेली आहे.हा तलाव होण्यापूर्वी माझ्या मामाचे नातेवाईक साहेबराव काकडे (गुरुजी) हे त्या क्षेत्रातील शेतकरी आहेत. त्यामुळेच केवळ मुलांना नोकरीसाठी आवश्यक असलेले धरणग्रस्त प्रमाणपत्रासाठी १ गुंठ्यांची खरेदी झालेली आहे. तसेच मोकाशे आडनावाच्या व्यक्तीचा आपण उल्लेख केला आहे.त्याच्या पत्नीच्या नावे तिच्या नातेवाईकांकडून जमीन तिच्या नावावर झालेली आहे.तसेच काही शेतकऱ्यांना मूल्यांकनाची जादा रक्कम आणि काही शेतकऱ्यांना कमी असा आरोप आपण करत आहात वास्तविक पाहता खुंटेफळ, कुंबेफळ, सोलापूरवाडी आणि बाळेवाडी या बुडीत क्षेत्रातील चार गावातील क्षेत्राचे संयुक्त मोजणी प्रस्ताव दि.०५ /०३/२०२० रोजी सादर झाला आहे तसेच उपाधीक्षक,भूमिअभिलेख यांनी दि.०३/११/२०२० रोजी संयुक्त मोजणी अहवाल उपविभागीय यांना सादर केला आहे. तसेच इतर घटकांची मूल्यांकने कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तालुका, कृषी अधिकारी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम,उपविभागीय अधिकारी वन विभाग यांना संयुक्त मोजणीत आढळलेल्या इतर घटकांच्या मूल्यांकनाचा आदेश दि.२५/११/२०२० रोजी दिलेला आहे. कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण यांनी दि.१८/०२/२०२१ आणि दि.१५/०७/२१ मध्ये मूल्यांकन सादर केलेली आहेत. म्हणजेच ही सर्व प्रक्रिया आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झालेले आहे आणि हे सर्व मूल्यांकने उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्याकडे सादर झाली त्यानंतर त्यांनी दि.०६ मार्च २०२३ मध्ये निवाडा घोषित आपण याबाबत या दोन वर्षात आक्षेप का घेतला नाही ? याचा दुसरा अर्थ असा की आपण या तलावाच्या बाबतीत काहीही अभ्यास न केल्यामुळे आपण आरोप करत आहात खुंटेफळ साठवण तलावाच्या श्रेय वादावरून आपणच वर्तमानपत्रात बातम्या देऊन सुरुवात केली आहे.सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर तुम्ही आणि आपण मिळून हे काम करू असे म्हणावयास हवे होते परंतु आपण वादाला सुरुवात केली असल्याचे आ. म्हणाले.

 

आ.सुरेश धस पुढे म्हणाले की, सीना मेहकरी प्रकल्पाचे काम देखील सन २००३ मध्ये तात्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल हे आष्टीच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावर असताना त्यांचे समोर मी ही योजना मांडली होती त्यामुळे माझ्याच काळात ९७ टक्के काम झाले होते. केवळ उद्घाटन नंतर करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेचे देखील श्रेय अन्य कोणीही घेऊ शकत नाहीत तसेच माझे स्पष्ट मत आहे. राम खाडे यांना आपणच देवस्थानाबाबत तक्रारी करायला लावल्या आहेत. आपणच शरद पवार साहेबांकडे जाऊन गृहमंत्री यांच्याकडे जाऊन अगदी विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) लावून देखील माझ्या विरुद्ध काहीही पुरावे सापडले नाहीत अशा प्रकारच्या तुम्ही हजारो तक्रारी करा असे तुम्हाला जाहीर आव्हान आहे..असे सांगत ते म्हणाले की दादेगाव येथील श्रीराम देवस्थानची ७०० एकर जमीन शिराळ गावातील नागरिकांकडे आहे. त्यापैकी आपणाकडेही १५० ते २०० एकर जमीन असावी..ही जमीन आपण फुकट खात आहात कारण १९९० सालापासून आतापर्यंत श्रीरामचंद्र देवस्थान दादेगाव यांना केवळ सर्व लाभधारकांनी मिळून एकूण २ लक्ष २५ हजार रु. दिलेले आहेत म्हणजे श्रीराम देवस्थान संबंधी किती आत्मीयता आहे हे दिसून येत आहे. शिराळ येथील कोणत्याही लाभधारकाचे नाव सातबारावर नाही तरी देखील आपण इतरांवर आरोप करत दुसऱ्यांचे घराचे वासे मोजत आहात दहा वर्षांपूर्वीच्या खरेदीचा आपण आता उल्लेख करून आपण राजकीय पोळी भाजत आहात या सर्व आरोपातून आपण डोंगर पोखरून काय बाहेर काढले आहे याचे आपण आत्मपरीक्षण करावे असेही आ.धस यांनी शेवटी सांगितले.

 

नावे सांगितली,क्षेत्र का नाही सांगितले ?-गणेश नवनाथ शिंदे

आम्ही लहान शेतकरी असून आमच्या मुलांना नोकरी लागावी या हेतूनेच धरणग्रस्त प्रमाणपत्र घेण्यासाठी, आम्ही दोन भाऊ आणि वडील अशा तीन जणांमध्ये एक गुंठा जमीन नातेवाईकांकडून घेतली आहे. तुमची मुले नशीबवान आहेत कारण तुमच्याकडे आयती शेकडो एकर जमीन खायला आणि कसायला असल्यामुळे तुमच्या समोर हा प्रश्नच येत नाही. तुम्ही पिटीआर वरील नावे सांगितले पण त्यावरील क्षेत्र का नाही सांगितले…

 

अर्ध्या गुंठ्याची खरेदी, आव मात्रशं भर एकराचा–मोहन हौसराव झांबरे

 आम्ही धरणग्रस्त प्रमाणपत्रासाठी अर्धा गुंठा (पाचशे स्क्वेअर फुट ) जमीन खरेदी केली आहे. आमदार साहेबांनी मात्र आम्ही शंभर एकर जमीन खरेदी केल्यासारखा आव आणला आहे हे चुकीचे आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles