20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पैशासाठी पत्नीचा खुन करणाऱ्या पतीस जन्मठेप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

पत्नीचा पैशासाठी छळ करून तिचा खून केल्याच्या गुन्ह्यात आरोपी शिवाजी महादेव फाटक (रा. जेवापिंप्री ता.जि. बीड) याला दोषी धरून त्याला जन्मठेपेची शिक्षा बीड येथील चौथे अति जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एस. पाटील यांनी बुधवारी सुनावली. मुंबई येथील प्रभा रमेश बोरकर यांची मोठी मुलगी सुरेखाचा विवाह जेबापिंप्री येथील शिवाजी फाटक यांचे बरोबर झाला होता. लग्नानंतर तिला सासरच्या मंडळींनी १५ दिवस चांगले नांदवले व नंतर तिला नवरा शिवाजी महादेव फाटक, सासरा महादेव चांगदेव फाटक, सासु द्वारकाबाई महादेव फाटक, नणंद सिमा यांनी टेलरींगचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेवून ये म्हणून छळ करण्यास सुरवात केली. यातच दि. २५ ऑक्टोबर २००२ रोजी शिवाजी फाटक याने सुरेखाच्या छातीवर गुप्तीवर वार करुन खून केल्याची घटना घडली.

या प्रकरणी सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम. आर. गरुड यांनी करून आरोपी विरुद्ध बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. गुन्हा करून आरोपी फरार होता. तो मिळुन आल्यानंतरनंतर तपासी अधिकारी बी. बी. जाधव यांनी पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकारपक्षातर्फे प्रकरणात एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने सादर केलेल्या पुराव्या आधारे व सहा सरकारी वकिल मंजुषा दराडे यांनी केलेल्या युक्तीवादामुळे बीड येथील चौथे अति, जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एस. पाटील साहेब यांनी आरोपी शिवाजी महादेव फाटक यास कलम ४९८ (अ) व ३०२ मध्ये दोषी स्वास ४९८ (अ) मध्ये ३ वर्ष शिक्षा व ५००० दंड तसेच कलम ३०२ भादवी मधे जन्मठेप व १०,००० ची शिक्षा सुनावली तसेच दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली. प्रकरणात सरकार पक्षातर्फे महा सरकारी वकिल ॲड.मंजुषा एम. दराडे यांनी बाजू मांडली. त्यांना सरकारी वकील बी. एस. राव, ॲड.अजय तांदळे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून परमेश्वर सानप, एम.बी. पी. एस आय श्री जायभाये यानी काम पाहिले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles