20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

टोमॅटोच्या दरवाढ पती-पत्नीमध्ये वादाचं कारण ठरली; भाजीत न विचारता टाकले दोन टोमॅटो, पती-पत्नीमध्ये जोरदार खडाजंगी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपूर्ण देशात सध्या टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शंभरीच्या आत असलेला टोमॅटोचा दर १४० रूपयांच्या पुढे गेला आहे. आता हीच दरवाढ पती-पत्नीमध्ये वादाचं कारण ठरली आहे. नवऱ्याने जेवण बनवताना भाजीसाठी दोन टोमॅटो वापरल्याने पत्नी मुलीसह घर सोडून गेली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यातुन समोर आली आहे. संजीव बर्मन असं व्यक्तीचं नाव असून, ते पत्नी आणि मुलीसह राहतात. संजय बर्मन यांचा खाणावळीचा व्यवसाय आहे.

संजीव यांनी काही दिवसांपूर्वी जेवण तयार करताना पत्नीला न विचारता दोन टोमॅटोचा वापर केला होता. या दोन टोमॅटो वापर करण्यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यामुळे रागावलेली पत्नी मुलीसह घर सोडून निघून गेली. संजीव यांनी पत्नी आणि मुलीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्या त्यांना कुठेही सापडल्या नाहीत. शेवटी संजीव यांनी पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

धनपुरी पोलीस ठाण्याचे संजय जैस्वाल यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, तक्रारदाराने जेवण बनवताना दोन टोमॅटोचा न विचारता वापर केल्याने पत्नी चिडली. त्यांनतर पत्नीने आपल्या छोट्या मुलीसह घर सोडले. दरम्यान पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर पत्नीने घरी परतण्यास होकार दिल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles