बीड |
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 से रब्बी 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी -अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक घरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ 1/- रुपया मरून PMFBY पोर्टल http://pmfby.gov.in वर स्वतः शेतकरी यांना तसेच बैंक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. 40/- देण्यात येते. परंतु जिल्ह्यातील काही सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून शेतक-यांकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या वृत्तपत्रातून तक्रारी प्राप्त होत आहेत.
सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ रु.1/- रुपया भरून पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी व CSC ने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी, बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे