20 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

लपून छपून करणाऱ्यांचा कंटाळा आला आहे, दोन महिने सुट्टी घेणार-पंकजा मुंडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

 

गेली ४ वर्षे पक्ष सोडण्याच्या चर्चा आहेत. अनेकदा स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. संबंधित चॅनेलवर मानहानीचा दावा दाखल केला आहे. माझ राजकीय करियर संपविण्याचा डाव आहे. मला पक्षाने डावलले तरी नाराजी नाही. पक्षाचा आदेश अंतिम आहे. माझे करियर कवडीमोल नाही, असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राहुल गांधी व सोनिया गांधी यांना प्रत्यक्षात पाहिलेले देखील नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. लपून छपून काम करणाऱ्यांचा कंटाळा आला आहे. या सगळ्यापासून अलिप्त राहण्यासाठी दोन महिने सुट्टी घेणार आहे. अंतर्मुख होऊन निर्णय घेणार आहे.

 

मानहानीचा दावा दाखल करणार 

भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली व त्या काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांनी आज मोठ्या प्रमाणात त्यांची नाराजगी व्यक्त केली आहे. तसेच ज्यांनी ही बातमी प्रसारित केली त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. त्याच सोबत सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीला त्या कंटाळल्या असून त्यांना २ महिने आराम करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितले आहे. मुंबईत त्या बोलत होत्या.

 

 

ठामपणे भूमिका मांडली 

२०१९ मध्ये माझा निवडणुकीत पराभव झाला. त्या नंतर अनेक निर्णय झाले. त्या निर्णयाने मी नाराज आहे ,पक्षाच्या बाहेर जाईन अशा चर्चा झाल्या. मी माझी भूमिका वेळोवेळी ठामपणे भूमिका मांडली आहे. गेल्या अनेक दिवसात अनेक नेते लोकांनी माझ्याविषयी चर्चा केल्या. पण परवा आलेल्या बातमीत असे सांगितले की, मी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली. हे साफ चुकीचे आहे. ज्यांनी ही बातमी दाखवली, त्या चॅनल विरोधात मी मानहानीचा दावा ठोकणार आहे. कारण मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी प्रत्यक्षात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना भेटले नाही आहे.

 

नाराजी व्यक्त केली नाही : पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, पाठीत खंजीर खुपसायला ते रक्त माझ्या शरीरात नाही. माझ्या बाबत ज्या काही बातम्या सुरू आहे,त त्या बाबत पक्षाने स्पष्ट उत्तर दिले पाहिजे. मागच्या काळात अनेकांना विधान परिषदा भेटल्या. पण माझे नाव नाही आले, म्हणून मी काही नाराजी व्यक्त केली नाही. भागवत कराड यांच्या यात्रेला मी हिरवा झेंडा दिला. विधान परिषदेच्या दोन्ही वेळेला मला फॉर्म भरायला सांगितले ,पण मी काही नाराजी व्यक्त केली नाही. मी कधी कोणाचे नावही घेतले नाही.

 

मी कोणत्याही पक्ष नेत्याशी माझ्या प्रवेशाबाबत आद्याप भेटलेली नाही. मला प्रचंड दुःख आहे. सध्या आपल्या चर्चा कुठे चालल्या आहेत. मी प्रचंड गोंधळलेली आहे. मला आराम करण्याची आवश्यकता आहे. मी राजकारणातून बाहेर पडायला मागे पुढे पाहणार नाही. पण मी आता एक ते दोन महिने सुट्टी घेणार आहे-पंकजा मुंडे

 

दोन महिने सुट्टी घेणार

पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की, त्यांना पंतप्रधान नरेंद मोदी यांचे वाक्य नेहमी आठवते. त्यात ते म्हणतात, ‘खातो नथी खावाणो देतो नथी’ यामुळे मला त्यांचे विचार फार आवडतात. सध्या शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही. पण पंडित दीनदयाळ उपाध्याय व अटळबिहारी वाजपेयी यांचा भाजप तसाच राहावी, ही माझी इच्छा असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

राजकीय समिकरणे बदलले

धनंजय मुंडे चार दिवसांपूर्वी मला भेटायला आले होते. ते मंत्री झाले म्हणून मी त्यांचे औक्षण केले. इतर कोणी मंत्री होत असेल, त्यापेक्षा माझा भाऊ मंत्री झाला तर त्याचा जास्त आनंद आहे. पण त्यांनी तो फोटो आज का ट्विट केला. मला माहीत नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलले आहेत. त्यातच कट्टर विरोधक असलेले मुंडे बहीण भाऊ यांच्या राजकारणावरही चांगलाच परिणाम झाला आहे. दिवंगत गोपिनाथ मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात यामुळे वितुष्ट आले होते. मात्र अजित पवारांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयामुळे हे दोघे बहीण भाऊ पुन्हा एकत्र आले आहेत. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे या त्यांचे औक्षण करतानाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles