20 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर…; पंकजा मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राज्याच्या राजकारणात कधीही काही घडू शकते याची प्रचिती गेल्या ४ वर्षात अनेकदा आली आहे. आधी भाजपा-राष्ट्रवादी, त्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी, त्यानंतर भाजपा-शिवसेना आणि आता भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी असं सरकार जनतेला बघायला मिळत आहे. त्यात आता ठाकरे बंधुनी एकत्र यावे असं आवाहन करणारे बॅनर्स वेगवेगळ्या शहरात लागले आहेत. तर दुसरीकडे मुंडे भाऊ-बहिण यांच्यातील कटुताही कमी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

 

भाजपासोबत आलेल्या राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी वरळीतील निवासस्थानी जात बहीण पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडे या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. मागील काही महिन्यांपासून त्या भाजपात नाराज असल्याच्याही चर्चा अधूनमधून येत राहतात. त्यात आता भाऊ धनंजय मुंडे यांना मंत्री बनवल्यानंतर पंकजा मुंडे काय निर्णय घेणार असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात होता. पण तूर्तास या दोन भाऊ बहिणींमध्ये प्रेमाचे नाते पाहायला मिळाले.

 

वरळीतील निवासस्थानी मंत्री धनंजय मुंडे आल्यानंतर बहिण पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर भावाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबद्दल धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटलं की, राज्याच्या मंत्री पदी नियुक्तीनंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे असं त्यांनी म्हटलं.

 

 

बीड जिल्ह्यात मुंडे कुटुंबात काका-पुतण्याचा संघर्ष काही वर्षापूर्वी पाहायला मिळाला. गोपीनाथ मुंडे यांच्याशी फारकत घेत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. काही वर्षांनी धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचीही जबाबदारी सांभाळली. २०१९ च्या निवडणुकीत बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव करत धनंजय मुंडे विजयी झाले. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर धनंजय मुंडे मंत्री बनले. त्यानंतर आता अजित पवारांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे यांनी वेगळी वाट धरत भाजपासोबत सरकार बनवले. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद संपुष्टात येणार का हे आगामी काळात राज्याला दिसून येईल.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1677182595787010048?s=20

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles