17.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

नऊ आमदार आणि दोन खासदार निलंबित शरद पवार यांचा मोठा निर्णय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.तसेच अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील निवड केली आहे. यातच आज शरद पवार गटाकडून दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवारांना धक्का देणारा शरद पवार गटाकडून घेण्यात आला आहे.

आज झालेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत शरद पवार गटाने ९ महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि एस आर कोहली यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अजित पवारांसह भाजपसोबत सत्तेत गेलेले ९ मंत्र्यांना देखील निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुळ राष्ट्रवादी कोणाची? हा वाद निवडणुक आयोगात असल्याचं कुणीही बैठक घेऊ शकत नाही. हा वादाचा निपटारा होईपर्यंत कुणीही बैठक होऊ शकत नाही. असे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles