18.2 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही.. शरद पवार गरजले!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

जे जे लोक या देशात भाजपसोबत गेले, त्या त्या प्रत्येक पक्षाला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला. अकाली दल, नितेश कुमार, आसाम गण परिषद, शिवसेना, जे जे पक्ष भाजप बरोबर सतीश सहभागी झाले तिथे सुरुवातीला काही म्हणे ठीक केले मात्र सहकारी उध्वस्त करणे हे सूत्र भाजपचे आहे. बाकी राज्यामध्ये जे घडले त्यापेक्षा वेगळे काही इथेही घडणार नाही त्या सर्वांना उध्वस्त करणे हेच भाजपचे सूत्र राहील अशी टीका शरद पवार यांनी करीत, चिन्ह कुठे जाणार नाही, पण पूर्वीचे एक आठवण सांगतो. आम्ही हाताच्या पंजावर लढलो, चरख्यावर लढलो, गाय वासरू चिन्हावर लढलो, घड्याळावर लढलो, चिन्हावर काही नसते परंतु चिन्हही जाऊ देणार नाही. काळजी करू नका.

राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे, २३ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. केंद्र सरकारमध्ये मी अनेक वर्ष काम केले. अनेक पंतप्रधानांसोबत काम केले, पण आता देशात संवाद राहिलेला नाही. ते हेच मोदी आहेत की, जे बारामतीत आल्यानंतर म्हणाले, मी पवार साहेबांचे बोट धरून राजकारणाला सुरुवात केली आणि त्यानंतर काही दिवसांतच ते जेव्हा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले, तेव्हा त्यांनी प्रचंड शिवीगाळ केली अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये केली.

 

पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एवढा भ्रष्ट असेल असे वाटत असेल तर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना सत्तेत का घेतले? हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि जन माणसांमध्ये वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार आम्हाला खासगीत सांगतात. पूर्वी म्हणजे राजीव गांधींच्या, नरसिंहराव यांच्या, मनमोहनसिंग यांच्या, गुजराल यांच्या काळातही दर मंगळवारी खासदारांना भेटण्यासाठी पंतप्रधान उपलब्ध व्हायचे, पण आज संवाद संपलेला आहे. बोलायची कोणाचीच हिम्मत नाही हा देश राज्य मोठी ठेवून चालवू शकतो अशा प्रकारची त्यांची पद्धत निर्माण केली आहे.

 

पक्षाचा ताबा घेणे लोकशाहीत योग्य आहे का? पूर्वी काँग्रेस भवनच्या बाकी काही अशीच स्थिती झाली होती पण कोणीही अशा प्रकारचे चुकीचे कृत्य केले नाही, पण आज नाशिकमध्ये जे घडले ते योग्य नाही.

 

चिन्ह कुठे जाणार नाही, पण पूर्वीचे एक आठवण सांगतो. आम्ही हाताच्या पंजावर लढलो, चरख्यावर लढलो, गाय वासरू चिन्हावर लढलो, घड्याळावर लढलो, चिन्हावर काही नसते परंतु चिन्हही जाऊ देणार नाही. काळजी करू नका.

 

आज माझ्याबद्दल काहीजण बोलले, पाठीमागे सगळ्यात फोटो माझा ठेवला होता. त्यांना माहिती आहे, आपले नाणे चालणार नाही. चालणारे नाणे घेतले पाहिजे, कारण त्यांचे नाणे खणकन वाजत नाही.

 

पांडुरंगाच्या दर्शनाला या राज्यात कोणी कोणाला थांबू शकत नाही. वारकऱ्यांची फक्त एक भावना असते, पांडुरंगाचे दर्शन घेऊ! पंढरीला पोहोचल्यानंतर ज्यांना मंदिरात जाता येत नाही, ते बाहेरून देखील कळसाचे आणि मुखदर्शन घेतात. त्यामुळे आम्हाला पांडुरंग म्हणायचे, आणखी काय काय म्हणायचे आणि पुन्हा आमच्याकडे दुर्लक्ष झाले असे म्हणायचे. हे योग्य नाही.

 

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, राज्यकर्ते असे असले पाहिजेत की, त्यांनी राज्य तर एकत्र ठेवायचे. आज राज्यकर्ते भाजपचे आहेत, पण वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी अमुक करणार, नाही तर तमुक करणार असे अनेकदा बोलायचे. दुसरीकडे आपले सहकारी असे आहेत की, ते असे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच राज्याच्या इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही असं ते म्हणाले आणि आता त्यांच्याबरोबरच ते नमस्कार चमत्कार करताहेत असे ते म्हणाले.

 

जो समाजात ऐक्याला तडा लावण्याचा प्रयत्न करतो तो देशप्रेमी असू शकत नाही. मात्र आज महागाई, महिलांचे प्रश्न, सुरक्षा या साऱ्या विषयावर बगल देण्यासाठी राज्यात देशात विविध ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच या दंगली केला जात आहेत, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles