13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

शिवसेनेतील बंडावेळी शिंदेंनी वापरलेली स्क्रिप्ट आता अजित पवार गटाच्या हाती; सर्वकाही ‘सेम टू सेम’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

आम्ही म्हणजेच पक्ष आहोत, हे वाक्य साधारण वर्षभरापूर्वी सर्वांनीच ऐकलं आहे. निमित्त होतं, एकनाथ शिंदे यांचे बंड. शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर बंडात सामील झालेले सर्वजण आम्हीच खरी शिवसेना आहोत म्हणत होते. तसेच महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. आता याचीच पुनरावृत्ती राष्ट्रवादीतील बंडानंतर होताना दिसत आहे.

आम्हाला कोणाच्या विरोधात जायचं नाही. कुणाची हकालपट्टी करायची नाही. आमचं बंड आहे की, आम्ही पक्ष आहोत, लवकरच कळेल. यावेळी विधीमंडळ नेतेपदी असलेले जयंत पाटील यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. शिवाय तसेच प्रतोदबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. असाच घटनाक्रम शिंदेंच्या बंडावेळी होता.

 

तसेच शिवसेनेतील बंडावेळी सुरुवातीला शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याविषयी काहीही बोलणं टाळलं गेलं होतं. आता राष्ट्रवादीत बंड करणाऱ्या नेत्यांकडून शऱद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी असाच आदार राखण्यात येत आहे.

 

शिवसेनेतील बंडानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर सातत्याने एकनाथ शिंदेंच्या नेत्यांकडून विश्वास दाखविण्यात येत होता. तसेच महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि विचारासाठी आम्ही भाजपसोबत गेल्याचं बोललं गेलं होतं. आता देखील राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटाकडून मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखविण्यात येत आहे. तसेच मोदींमुळे रखडलेले कामं मार्गी लागतील, असं अजित पवार यांनी म्हटलं.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles