20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अजित पवारांसह ९ आमदारांवर अपात्रतेची कारवाई; राष्ट्रवादीची कायदेशीर लढाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | 

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारांसमवेत भाजपसोबत जात असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे अजित पवार यांनी अचानकपणे दुपारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या आणखी ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात झालेला हा भूकंप महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा ठरला. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करताना या शपथविधीला आपलं समर्थन नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायदेशीर पाऊले उचललीत जात आहेत. जयंत पाटील यांनी रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना अपात्र करण्यात आल्याची माहिती दिली.

राष्ट्रवादीतील अनेक आमदार माझ्या आणि पवारसाहेबांच्या संपर्कात आहेत. त्यांना परत यायचं आहे. त्यामुळे, आम्ही त्या सहकारी आमदारांवर अन्याय करणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण, ९ आमदार म्हणजे पक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे, राष्ट्रवादी पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्त्वाने या आमदारांच्या अपात्रकेची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. संबंधित आमदारांनी पक्षविरोधी कारवायी केली, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलंय, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

 

अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांना मी ईमेलद्वारे पाठवले आहे. त्यांना ४ वेळा फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांना ती याचिका पोहोच होईल याचीही तरतूद केलीय. मात्र, त्यांना संपर्क झाला नाही. त्यामुळे, व्हॉट्सअपद्वारेही त्यांना ते पिटीशन पाठवले असून त्यांनी लवकरात लवकर, म्हणजे उद्याच या याचिकेवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे, आता माझ्या आदेशानुसार ते जो व्हीप बजावतील तो व्हीप राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना लागू राहणार आहे, ्असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले जयंत पाटील

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार काम करत होते. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे विधानसभा सदस्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन शपथ घेतल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्याकडून देखील पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत आदरणीय शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली. तसेच, देशातील ९ राज्यात पक्ष फोडाफोडीचं असं राजकारण भाजपाकडून होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles