18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

शिंदेंच्या ‘त्या’ ४० बंडखोरांची आता किव येते, अजित पवारांसोबत आता बसणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि राजाची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड पुकारत शिवसेना फडवणीस सरकार सत्तेत येण्याचा निर्णय घेतलाय.याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. या सर्व राजकीय परिस्थितीवर आता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला खोचक टोला हाणला आहे.

 

जे निधी देत नाहीत म्हणून ओरड होत होती, आता तेच मांडीला मांडी लावून बसणार! आता कोणाला दोष देणार? असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी हाणला आहे. मला कीव येते त्या ४० जणांच्या गॅंगची. अगोदरच मंत्री होण्याहून लाथाळ्या होत्या, आता तर मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर..! अशी शाब्दिक टिप्पणी देखील केली आहे.

 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष हे आव्हान स्वीकारतील आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे पुनश्च घेऊन जातील. लढेंगे भी, जितेंगे भी! विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची भीती मिंधे गटापेक्षा भाजपलाच अधिक वाटते आहे. निकालाचा उलटफेर झाला तर सरकार वाचवण्यास केलेला हा खटाटोप आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

ज्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा कारण देत शिंदे गट बाहेर पडला, आज तेच त्यांच्या मांडीला मांडिला लावून बसले! जे शिवसेनेच्या चिन्हशिवाय निवडून येऊ शकत नाहीत अश्याना बंडखोरी करून मंत्रीपदाची स्वप्न पडत होती. आता कुठे जाणार आहात? अस सवाल ही केला आहे. हे तुमच्या नेत्यालाच भाजपने उभे केलेले आव्हान आहे. आता तुमच्यापुढे तिहेरी जनता, महाविकास आघाडी, भाजप असं तिहेरी आव्हान असणार आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles