18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

राष्ट्रवादीचे नवीन पक्षतेने आणि प्रतोद जितेंद्र आव्हाड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजा पुन्हा एकदा महाभूकंप घडला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. अजितदादांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांत शपथविधी सोहळा पार पडला.या शपथविधी सोहळ्यात अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडेंसह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सगळ्या घटनाक्रमावर शरद पवारांची दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असं सूचक विधान केलं आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांचं नाव प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी सूचवण्यात आलं आहे.

 

दरम्यान, जितेंद्र आव्हाड म्हणाले, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्याकडे आहे. त्यांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेतेपदी निवड केली आहे. मी जे व्हीप काढेल ते त्यांना लागू होईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 25-25 वर्ष मंत्रिपदे भोगली. ज्या नेत्याने पराकाष्ठ केली ते पद तुम्हाला दिली. या माणसाला या वयात ज्याचा अखेरचा काळ आहे,

त्या बापाला अश्या परिस्थितीमध्ये आणणं हे माणुसकीला पटणार नाही, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. मी मेलो तरी शरद पवार यांना सोडणार नाही, चर्चा काय होती माहीत नाही पण निष्ठेला न्याय मिळतो. अवघड स्थितीमध्ये पक्ष असला तर त्याची संधी म्हणून बघितले पाहिजे. शिवसेनेसारखी स्थिती करण्याचा प्रयत्न केला, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles