20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

मोदींच्या राज्य बँक घोटाळ्याच्या आरोपानंतर राष्ट्रवादी फुटली ?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील सभेत थेट राष्ट्रवादीवर राज्य सहकारी बॅकेत ७० हजार कोटीचा घोटाळा केला असल्याचे सूचक वक्तव्य केले , यामध्ये राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खनन घोटाळा या विषयावरून राष्ट्रवादी वर आणि विशेष म्हणजे अजित पवार यांच्यावर आरोप प्रत्यारोप पहायला मिळाले.पण जेव्हा देशांचे पंतप्रधान आपल्या सभेतून थेट एखाद्या पक्षांचे नाव घेऊन आरोप करतात म्हणजे यामध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय त्यांनी आरोप केला नसावा, मात्र आपण राज्यातील राजकीय परिस्थिती बघितली तर कुठे चौकशी च्या फेर्यात अडकून जेल मध्ये जायचं त्यापेक्षा सत्तेत सहभागी होऊन जनतेच्या शिव्या खाल्ल्या तरी चालतील अशी परिस्थिती पहायला मिळत आहे.

यामुळेच अजित पवार देखील आपल्यावरील झालेल्या आरोपावरून कुठं अडकण्यापेक्षा सत्तेत सहभागी झालेले बरं म्हणून आज राष्ट्रवादी चे काही आमदार बरोबर घेऊन जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडल्याची चर्चा सुरू झाली , असून यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेतील 70 हजार कोटीच्या राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या सुचक वक्तव्यानंतर अजित पवारांनी थेट भाजपच्या गोटात उडी घेऊन मंत्री पद मिळवलं.यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा खुप मोठा राजकीय भूकंप पहायला मिळाला.

यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून केलेल्या सूचक वक्तव्यानंतर आणि आज झालेल्या राजकीय भूकंपानंतर त्या 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचं पुढे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles