डोंगरकिन्ही |

भरधाव टेम्पो व स्कार्पिओची समोरासमोर जोराची धडक होवून झालेल्या भीषण अपघातात स्कार्पिओ गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेे आहे. अपघातातील मयत व जखमी एकाचा कुंटुंबातील आहेत. सध्या वाघोली पुणे येथे असलेले हातागळे कुटूंबिय कार्यक्रमासाठी आपल्या गावी कुप्पा, ता.वडवणी येथे येत असताना अपघात झाल्याची माहिती मिळाली.

बीडकडून अहमदनगरकडे जाणार्‍या टेम्पोने (एमएच-21 बीएच-3820) बीडकडे येणार्‍या स्कार्पिओला (एमएच-12, एफके-9010) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात स्कार्पिओ गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. मृतामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सुनिता रमेश हातागळे (वय 28) आशाबाई काशीनाथ कांबळे (वय 70) मयत, रमेश कुंडलीत हातागळे, दत्ता कुंडलीक हातागळे, सविता दत्ता हातागळे, स्कार्पिओ ड्रायव्हर मयत आहे.

घटनास्थळी अंमळनेर पोलीसांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. दोन्ही वाहने रस्त्यावरच आडवी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ही वाहने पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने बाजूला करत वाहतूक कोंडी सुरळीत केली.