16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

तीन महिन्यातच झाला प्रेमविवाहाचा दुर्देवी शेवट ; सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी |

एकमेकांवर प्रेम जडले,प्रेमाच्या आणाभाका घेत एकमेकांच्या प्रेमात एकांत बुडालेल्या दोघांनी प्रेमविवाह करून संसार थाटण्यास सुरुवात केली.लग्न होऊन तीन महिन्याचा काळ जाताच प्रेमाला नजर लागली अन् तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी येथे घडली असुन अंभोरा पोलिस ठाण्यात सासु,पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी २० जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल आदेश चौधरी वय वर्ष २० असे आत्महत्या केलेल्या नव विवाहितेचे नाव आहे.

 

आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी येथील आदेश चौधरी याचे एकमेकांवर प्रेम जडले होते.याच प्रेमाचे रूपातंर तीन महिन्यापुर्वी लग्नात झाले.एकमेकांवर जीवापाड प्रेम असलेली जोडीने सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते.पण काही दिवसातच घरातील वातावरण खराब होऊ लागले.सासु,पती वारंवार त्रास देऊ लागल्याने प्रेम काळवडले आणि याच त्रासातुन पती नगरला तर सासु शेळ्या चारण्यासाठी गेल्याची संधी साधत तिने नको आयुष्य म्हणत घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ रोजी सहाच्या दरम्यान घडली. महिलेचा मामा दत्तात्रय लेकुरवाळे रा. कुसडगांव ता.जामखेड. जि.अहमदनगर याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात आरोपी पती आदेश चौधरी,सासु आलका चौधरी,मावस ननंद मिना साबळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन नवरा आणि सासू अटक असून मावस नणंद मिना साबळे यांना अद्याप अटक झालेली नाही.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीत आहेत.

अंभोरा पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दत्तात्रय शेषराव लेकुरवाळे वय 32 वर्षे व्यवसाय शेती रा. कुसडगाव ता. जामखेड जि. अहमदनगर मी आई वडील व बायको मुलांसह राहत असुन माझी भाची पायल सुरेश गोंदकर ही सप्टेंबर 2022 पासुन शिक्षणासाठी माझ्याकडे राहण्यास होती. तिचे कॉलेज आष्टी येथे असल्याने मी तिला जामखेडपर्यंत मोटार सायकलवर आणुन सोडत असे त्यानंतर ती बसने जामखेड ते आष्टी प्रवास करत असे. पायल ही दि. 02 मार्च 2023 रोजी रात्री 01.00 वा. सुमारास घरातुन कोणाला काही एक न सांगता निघुन गेली असता आम्ही दिवसभर तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु तिचा काही पत्ता लागला नाही त्यानंतर संध्याकाळी तिच्याशी संपर्क झाला असता तिने त्याचदिवशी ढोबळ सांगवी येथील आदेश राजु चौधरी याचे सोबत आळंदी येथे लग्न झाले असल्याचे समजले. त्यानंतर आम्ही त्यांना समजावुन सांगितले की, तुम्ही घरी या परंतु त्या दोघांनी घरी येण्यास नकार दिला. मी लगेच पायलच्या आई वडीलांना पायल ने ठोबळसांगवी येथील आदेश चौधरी याचेसोबत आळंदी येथे लग्न केले असल्याची माहीती दिली होती.पायलच्या लग्नानंतर मी साधारण एक महिन्यांनी पायल हिला तिच्या सासरी ठोंबळसांगवी येथे भेटायला गेलो असता त्यावेळी तिचा नवरा हा कामानिमित्त बाहेर गेला होता तर पायलची सासु यांना पायलच्या घरी गेल्यानंतर मी पायल हिला तु खुश आहे का विचारले असता तिने सांगितले की, तिचे आता आदेश याचे सोबत लग्न झाले असुन तिचे जे काही बरे वाईट होईल ते येथेच होईल ती काही तिकडे येवु शकत नाही असे सांगितले.याशिवाय मला माझी बहिण मंजूषा विठ्ठल कोल्हे रा. जामखेड हिच्याकडुन माहीती मिळत होती की, पायल हि तिला अधुनमधून फोन करून सांगते की, तिचा नवरा आणि सासु हे दोघे तिला तिच्या आई वडीलांना भेटायला माहेरी येवु देत नाही आणि घरच्यांना फोन पण करून देत नाही तसेच तिची सासु तिने काम केले नाही तर घालुनपाडुन बोलते. याशिवाय तिची अहमदनगरची मावस नणंद मिना साबळे हि सुद्धा नेहमी घरी येजा करते तेव्हा तुझ्या आईबापाकडे काय आहे भिकारी आली आमच्या घरी असे बोलत असे तसेच ती म्हणत असे की, तिच्या भावाबरोबर लग्न करुन मागे लागुन आलीस व येताना आई वडीलांकडुन व मामाकडुन काही आणले नाही असे बोलत असे. त्यानंतर मी बहिण मंजुषा हिला सांगितले की, मी तिला भेटायला गेलो होतो परंतु ती म्हणाली की, तिला सासु, नवरा तसेच मावस ननंद हे मानसिक त्रास देतात परंतु आता तिचे लग्न झाले असुन तिचे जे काही बरे वाईट होईल ते येथेच होईल ती माहेरी किंवा नातेवाईकाला भेटायला येवु शकत नाही.दि. 19/06/2023 रोजी सायंकाळी 07.30 वा. सुमारास मी जामखेडला असताना मला माझा भाचा अभिषेक गोंदकर याने फोन करुन माहीती दिली की, पायल दिदीचे खुप दुखत असुन तिला दवाखान्यात नेले असुन तुम्ही लवकर कड्याला या असे तो बोलला मी मित्राला घेवुन कड्याला येत असताना मला समजले की, पायल हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेतला आहे म्हणुन मी माझी कड्यातील बहिण हिच्यासह ठोंबळसांगवी कडे यायला निघालो असता समजले की, पायल हिला पोस्टमार्टम करणेकामी सरकारी दवाखाना कडा येथे घेवुन येत आहे म्हणुन मी कडा येथील सरकारी दवाखान्यात आलो. त्यावेळी खुप रात्र झाल्याने आम्ही नातेवाईकांनी तेथील सरकारी डॉक्टरांना पोस्टमार्टम सकाळी करणेबाबत विनंती केली असता त्यांनी हो सांगितले. त्यानंतर आज रोजी माझी भाची. पायल सुरेश गोंदकर हिचे मृतदेहावर पोस्टमार्टम होवुन अंत्यविधी करण्यात आला आहे. त्यानंतर मी तक्रार देणेकरिता अंभोरा पोलिस स्टेशन येथे आलो आहे. तरी दि. 19/06/2023 रोजी माझी भाची पायल आदेश चौधरी हिने तिच्या सासरी मौजे ठोंबळसांगवी येथे तिचा नवरा आदेश राजु चौधरी आणि सासु अलका राजु चौधरी यांनी तिला माहेरी येऊ न देणे तसेच घरच्यासोबत फोनवर बोलू न देणे अशा प्रकारचा मानसिक त्रास दिला तसेच मावस नणंद मिना साबळे हिने घालुनपाडुन बोलून मानसिक त्रास देवुन पायल हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे म्हणुन माझी सदर लोकाविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. माझी खबर मी वाचून पाहीली असता ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरी आहे असे अंभोरा पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles